Home Maharashtra तेव्हापासून नगराध्यक्षा या “१०५ अर्धवटराव” कडे आलेच नाहीत.! — मंत्री चंद्रशेखर...

तेव्हापासून नगराध्यक्षा या “१०५ अर्धवटराव” कडे आलेच नाहीत.! — मंत्री चंद्रशेखर बावनकुळेही यावर बोलून गेले… — अर्धवट रोडावर जनतेचा संताप…

ऋग्वेद येवले

  उपसंपादक

दखल न्यूज भारत

साकोली : सहा सात वर्षांपूर्वी उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे शहरातील पंचशील वार्डात या अर्धवट रोडावर आले होते. तेव्हा नगराध्यक्षा धनवंता राऊत यांना विचारणा केली. तेव्हा सांगितले की, आचारसंहिता सुरू आहे. संपल्यावर लगेच रोड निर्माण सुरू होईल. पण मंत्री तर गेले आणि तेव्हापासून येथे नगराध्यक्ष या “अर्धवटराव” कडे आलेच नाहीत. असा जनतेचा संताप आता अनावर होत आहे. हा अर्धवट रोड पूर्ण करा अशी एकमुखी मागणी केली जात आहे. 

           सविस्तर की, शहरातील पंचशील वार्ड जिल्हा परिषद हायस्कूल मागील एक सिमेंट रोड सात वर्षांपूर्वी तयार केला. पण त्याला “अर्धवटराव” ही पदवी दिली. म्हणजेच बलराज नंदेश्वर ते जगजीवन जांभूळकर यांच्या घरापर्यंत हा १०५ मीटरचा सिमेंट रोड कसा काय सोडला.? तेव्हा स्व. झामदेव येवले यांचे घरी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे बैठकीला आले असता नगराध्यक्षा धनवंता राऊत यांना बोलले होते की, “हे काय आहेत तुमचे रोडांचे काम, लक्ष का देत नाही” यावर नगराध्यक्षा धनवंता राऊत यांनी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सांगितले की “साहेब आता आचारसंहिता सुरू आहे, ती संपल्यावर लगेच या कामाला सुरुवात होईल” असे सांगितले. पण तेव्हापासून या १०५ मीटर अर्धवट रोडवर ना नगराध्यक्षा आल्या, ना दोन्ही ८ व ७ प्रभागातील नगरसेवक नगरसेविका आल्या. आणि आज हा रोड तसाच “१०५ अर्धवटराव” स्थितीत पडून आहे. 

           सदर प्रभाग हा ६ व ७ क्रमांक येत असून आजपर्यंत या अर्धवटराव रोड कसा पूर्ण करता येईल. हा रोड १०५ मीटर कसा काय शिल्लक राहिला.? या अर्धवट रोडसाठी शासनाकडे पैसा नाही का?याबाबत जनतेने शंका व्यक्त केली असून तातडीने हा अर्धवट असलेला रोड पूर्व सिमेंट रोड तयार करण्यात यावा अशी येथील महिला पुरुष जनतेने एकमुखी मागणी केली आहे.