Home Breaking News ब्रेकिंग न्यूज… — उपसरपंच अशोक ज्ञानेश्वर चौधरी करणार पंचायत समिती चिमूर येथे...

ब्रेकिंग न्यूज… — उपसरपंच अशोक ज्ञानेश्वर चौधरी करणार पंचायत समिती चिमूर येथे आत्मदहन… — १०/०८/२०२५ पर्यंत विहीर बांधकाम लाभार्थ्यांचे रुपये देण्याची केली मागणी…

शुभम गजभिये 

विशेष प्रतिनिधी.. 

    नरेगा अंतर्गत विहिरीचे बांधकाम शेतकऱ्यांनी केले.पण,शासकीय स्तरावरुन विहीर बांधकाम करणाऱ्या लाभार्थ्यांना फुटकी कवळीही देण्यात आली नाही.

     यामुळे विहीर बांधकाम करणाऱ्या शेतकऱ्यांची दयनिय अवस्था झाली असून त्यांना १० आॅगष्ट पर्यंत रुपये देण्यात यावे अशी विनंती शंकरपूर ग्रामपंचायत उपसरपंच अशोक चौधरी यांनी अर्जाद्वारे केली आहे.

     १५ आॅगष्ट पर्यंत विहीर बांधकाम केलेल्या शेतकऱ्यांना रुपये न दिल्यास आत्मदहन १६ आॅगष्ट ला करणार असल्याचा इशारा चिमूर गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

      मौजा शंकरपूर येथील सन २०२३-२०२४ मध्ये नरेगा अंतर्गत वैयक्तिक सिंचन विहीर बांधकाम पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांचे अनुदान १० ऑगष्ट पर्यंत अदा न केल्यास १६ ऑगष्ट २०२५ ला आत्मदहन करीत असल्याचा दिलेला इशारा शासकीय यंत्रणेत खळबळ माजविणारा आहे.

       चिमुर तालुक्यातील मौजा शंकरपूर येथील मागेल त्याला विहीर नरेगा अंतर्गत सिंचन विहीर हि वैयक्तिक राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत असून शेतकऱ्याचे उत्पन्न वाढावे या उद्देशाने हि योजना राबविण्यात आली आहे.मौजा शंकरपूर येथील वैयक्तिक विहीरीचे बांधकाम पूर्ण झाले आहे.

     शेतीला सिंचनाची सोय व्हावी,गावातील मजुरांना गावातच काम मिळावे या उद्देशाने शेतकऱ्यांना चार लक्ष रुपये किमंतीची सिंचन विहीर बांधकाम योजना सुरु आहे.

      सिंचन विहीरीचे अनुदान सरळ लाभार्थ्याच्या बैंक खात्यात शासनाकडुन जमा केले जाते.मात्र,अद्यापही लाभार्थ्यांना सदर सिंचन विहीरीचे अनुदान प्राप्त झाले नाही.सदर अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांना मिळाली नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. 

      याबाबत पंचायत समिती चिमूर येथील संबंधित कार्यालयाशी अनेक पत्रव्यवहार करण्यात आले आहे.परंतु त्यांच्याकडून आजपर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.तसेच लाभार्थ्यांना अनुदान प्राप्त झाले नाही.

        मौजा शंकरपूर येथील सन २०२३-२०२४ मध्ये नरेगा अंतर्गत वैयक्तिक सिंचन विहीर बांधकाम पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांचे अनुदान १० ऑगस्ट पर्यंत अदा करण्यात यावे.अन्यधा येत्या १६ ऑगस्ट २०२५ ला पंचायत समिती चिमुरचे आवारात आत्मदहन करण्यात येईल,याची नोंद घ्यावी असेही उपसरपंच अशोक चौधरी यांचे मत आहे.

       सदर निवेदनाच्या प्रती ना. देवेंद्र फडणवीस,मुख्यमंत्री,म.रा.मुंबई,ना.अशोक उईके पालकमंत्री चंद्रपुर जिल्हा,जिल्हाधिकारी चंद्रपुर,पोलीस अधिक्षक चंद्रपुर,मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.चंद्रपुर,उपजिल्हाधिकारी (रोहयो) चंद्रपुर,पोलीस निरीक्षक साहेब,पोलीस स्टेशन चिमुर यांना पाठविण्यात आल्या आहेत.