युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या(अजित पवार) दर्यापूर-अंजनगाव विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्षपदी प्रा. डॉ. सुशिल पांडुरंग गावंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अमरावती जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष संतोष महात्मे यांच्या हस्ते ही नियुक्ती करण्यात आली.
यावेळी जिल्हा कोषाध्यक्ष प्रविण भुजाडे, गुड्डू पठाण, राजेश बर्वे, दर्यापूर तालुकाध्यक्ष ग्रामिण निलेश मोपारी,दर्यापूर शहराध्यक्ष अमोल गहरवाल ,ॲड जगदीश विल्हेकर जिल्हाध्यक्ष सामाजिक सामाजिक न्याय विभाग, तालुका युवक काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष नितीन गावंडे, गजानन सोळंके यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
ही नियुक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधान परिषदेचे आमदार संजय खोडके, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सुरेखाताई ठाकरे, आमदार सुलभाताई खोडके, माजी आमदार देवेंद्र भुयार, जिल्हाध्यक्ष संतोष महात्मे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती बाळासाहेब राऊत व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक शेखर पाटील हुतके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
प्रा.डॉ. सुशिल गावंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक, विद्यार्थी, सांस्कृतिक आणि तालुका पातळीवरील विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. त्यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेस व विद्यार्थी काँग्रेस अमरावती ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष, दर्यापूर तालुकाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे चिटणीस, पक्षाच्या कला-किडा व सांस्कृतिक विभागाचे माजी प्रदेश उपाध्यक्ष अशा अनेक पदांवर कार्य केले आहे. सध्या ते दर्यापूर तालुका सहकारी शेतकी खरेदी-विक्री संस्थेचे संचालक म्हणून कार्यरत आहेत.
त्यांच्या संघटन कौशल्यामुळे दर्यापूर – अंजनगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक बळकट होईल, असा विश्वास स्थानिक पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. नव्या जबाबदारीबाबत कार्यकर्त्यांमध्ये आनंद आणि उत्साहाचे वातावरण आहे.
राजेंद्र बारब्दे तालुकाध्यक्ष अंजनगाव ग्रामिण, नितीन मेटकर शहराध्यक्ष अंजनगाव, शत्रुघ्न नेहेर जिल्हा सहसचिव, बाबुभाई खान माजी शहराध्यक्ष, उद्धवराव नवलकर जिल्हा सरचिटणीस, अनंत राऊत जिल्हा उपाध्यक्ष, रमेश हिंगणकर सेवा दलाचे माजी शहराध्यक्ष , कुलदीप काळे जिल्हा सरचिटणीस, निलेश जुनघरे जिल्हा सरचिटणीस, शुभम होले, किरण अरबट, पियुष हुतके, कपिल पोटे शहर उपाध्यक्ष, संतोष शिंदे शहर उपाध्यक्ष, गौरव पाटील गावंडे, प्रतिक नाकट, योगेश हिंगणकर शहर संघटक, गजानन मानकर, हर्षल खाडे, गजानन खेडकर, अनुप गावंडे असदपूर सर्कल आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने अभिनंदन व आनंद व्यक्त केला.



