Home Political राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या चंद्रपूर शहर जिल्हाध्यक्षपदी बेबीताई उईकेंची निवड!.. ...

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या चंद्रपूर शहर जिल्हाध्यक्षपदी बेबीताई उईकेंची निवड!.. — कार्यकर्त्यांंनी केले या निवडीचे स्वागत!…

शुभम गजभिये 

 विशेष प्रतिनिधी…

       राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये अनेक घडामोडी घडत असतानाच पक्ष नेतृत्वाने जुन्या आणि प्रामाणिक पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होतील तोच दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा कार्याध्यक्ष बेबीताई उईके यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या चंद्रपूर शहर जिल्हाध्यक्षपदी एकमताने निवड झाली आहे.

       उईके या मागील पंधरा वर्षापासून शरदचंद्र पवारांच्या कट्टर समर्थक आणि धडाडीच्या महिला कार्यकर्त्या आहेत. 

        चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात इतर कुठल्याही पक्षापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात महिला आघाडीत काम करीत असताना गावाखेड्यांत ते तालुक्यांपर्यंत जिल्हाभर महिलांची भव्य फळी निर्माण करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बळ देण्याचे काम चंद्रपूर जिल्ह्यात बेबीताई उईके यांच्या माध्यमातून करण्यात आले.

       शहरी भागात देखील उईके यांनी आपल्या कुशल संघटनात्मक धोरणामुळे अनेक कार्यकर्ते पक्षात जोडण्याचं काम केले आहे. एक सर्वसामान्य कुटुंबातील महिला आणि कुठलीच राजकीय पार्श्वभूमी नसताना बेबीताई उईके यांनी आपल्या संघटन कौशल्य आक्रमक नेतृत्वाच्या जोरावर आपली वेगळी छबी चंद्रपूर जिल्ह्यात निर्माण केली आहे.

      यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशच्या नेत्यांनी सर्वानुमते बेबीताई उईके यांना चंद्रपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिलेली आहे.

      बेबीताई उईके यांच्या नियुक्तीमुळे भविष्यात होऊ घातलेल्या चंद्रपूर शहर महानगरपालिका निवडणुकीमध्ये पक्षाला अधिक नगरसेवकांच्या जागा जिंकता येईल यात तिळमात्र शंका नाही. 

      त्यांच्या या निवडीमुळे पक्षांमध्ये नवचैतन्याचे वातावरण निर्माण झालेले आहे.तर कार्यकर्त्यांनी त्यांचे नियुक्तीचे स्वागत केले आहे.