बाळासाहेब सुतार
निरा नरसिंहपुर प्रतिनिधी
सालाबाद प्रमाणे पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथील दानापा महाराज यांचा भंडारा टाळ व मृदंगाच्या गजरात जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल नामाचा गजर करीत उत्साहात संपन्न झाला.
गावचे विद्यमान सरपंच, आजी-माजी सरपंच, साखर कारखाना संचालक, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष तसेच सर्व मान्यवर व पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांच्या सौजन्याने दानापा महाराज पालखी उत्सवाचा भंडारा करण्यात आला.
शनिवार दिनांक 12 रोजी 8 ते10 या वेळेत किर्तन नंतर रात्रभर हरिजागराचा कार्यक्रम झाला. रविवार दिनांक 13 या दिवशी सकाळी पालखी घेऊन पिंपरी पंचक्रोशीतील ग्राम प्रदक्षिणा टाळ आणि मृदंगाच्या गजरात शेकडो भाविकांच्या उपस्थित संपूर्ण गावामध्ये ग्राम प्रदक्षिणा करण्यात आली.
तुळजा भवानी मातेच्या मंदिरा समोरील प्रांगणात सोंगी भारुडाचा कार्यक्रम ह-भ-प कापसे महाराज बार्शी यांचा घेण्यात आला.
कार्यक्रमासाठी विणेकरी, मृदंग वादक, टाळकरीव,भाविक भक्त शेकडोच्या संख्येने उपस्थित होते.
पिंपरी बुद्रुक, ओझरे, टनु ,गणेशवाडी, गोंदी, बाबळगाव,गारअकोले, गोंदी, गिरवी, सराटी, आदी भागातून सर्व भाविक भक्त व भजनी मंडळ उपस्थित होते.
पालखी उत्साहानिमित्त सौगी भारूडा नंतर विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये ह-भ-प,राम महाराज शेळके यांची काल्याची कीर्तन सेवा घेण्यात आली व शेवटी पिंपरी बुद्रुक ग्रामस्थांच्या वतीने आलेल्या सर्व भाविक भक्तांना महाप्रसाद देऊन दानापा महाराज भंडाऱ्याची सांगता झाली.



