धर्माचा खरा अर्थ नैतिकता.नैतिकता म्हणजे सत्य न्याय निती आणि दया क्षमा शांती.परंतु या अर्थाचा धर्म कुणीही पाळत नाही.याचा अर्थ सारेच धर्मविहीन आहेत,धर्मद्रोही आहेत.धर्माचे तत्व न पाळणे म्हणजेच अधर्म करणे होय.आणि धर्माचे तत्व म्हणजे नीती तत्व म्हणजेच दया क्षमा अहिंसा शांती प्रेम ,न्याय सत्य पाळणे म्हणजेच नैतिक मार्गाने जाणे,म्हणजेच नैतिक व्यवहार करणे म्हणजेच धर्म पाळणे होय.यालाच सत्य धर्म म्हणतात.
धर्म हा माणसासाठी असतो,माणूस धर्मासाठी नाही.म्हणून माणूस धर्मात बदल करू शकतो,धर्मात काही चुकीचे नियम किंवा चुकीच्या काही गोष्टी असल्यास त्यात बदल करू शकतो.कारण शेवटी धर्म माणसांनीच निर्माण केला आहे,म्हणून माणूस धर्मात बदल करू शकतो.धर्मातील अंधश्रद्धा नष्ट करू शकतो.कारण धर्म म्हणजे एक संस्थाच होय.यास धर्मसंस्था असे पण म्हणतात.संस्था म्हटले की,धेय्य उद्दिष्ट आणि नियम असतात,जे सर्व सभासदना ते पाळावे लादतात.म्हणून धर्माचे पण असेच आहे.जो ज्या धर्माचा त्याने त्या धर्माच्या अटी नियमाचे पालन केलेच पाहिजे,नाही केले तर तो त्या धर्माचा होऊ शकत नाही, अशी अलिखित धर्माचे संविधान असते.देशाच्या संविधानानुसार जसे लोक वागतात,नव्हे वागावेच लागते,तसेच धर्माचे संविधानानुसार त्या त्या धर्माच्या लोकांना वागावे लागते.धर्माचे संविधान म्हणजे त्यांचे धर्मग्रंथ.उदा.बायबल, कुराण, गीता, बुद्ध धम्म .इत्यादी.धर्माच्या नियमात लवचिकता नसते, बौद्ध धर्म सोडला तर,पण बुद्ध धर्मास जे लोक पारंपरिक धर्म म्हणून समजतात ते सोडता जे धर्मास धर्म न मानता धम्म म्हणजे मार्ग,असे समजून जे आचरण करतात ते उपासक इतर धर्मासारखे अंध भक्त नसतात.
पारंपरिक धर्म हे माणसाला केंद्रबिंदू म्हणून न समजता,म्हणजेच माणसाला केंद्रस्थानी न ठेवता ते देवास केंद्रस्थानी ठेवतात,कारण ईश्वरानेचं धर्म निर्माण केला असे पुरोहित सांगतात,त्यावर भक्तगण विश्वास ठेवतात.( सत्य हे की धर्म हा ईश्वरनिर्मित नसून मानवनिर्मित आहेत ). धर्माचा थेट देवाशी संबंध जोडल्यामुळे ” धर्म म्हणजे देवाकडे जाणारा मार्ग वाट होय,आणि ती वाट दाखवण्याचे काम हे धर्मगुरूच करतात.इतर विषयाच्या गुरूंना ते जमत नाही,किंवा ती वाट दाखविण्याचा अधिकार नाही.अशी मान्यता आहे.दुसरी गोष्ट ही की,देवाची आराधना केल्याशिवाय देव भेटत नाही,किंवा प्रसन्न होत नाही,त्याची कृपा होत नाही.म्हणून आराधना केलीच पाहिजे.ही आराधना म्हणजे जप तप,पूजा आरती,तीर्थयात्रा, नाम स्मरण,संसारत्याग इत्यादी कर्मकांड करणे म्हणजेच धर्म पाळणे,हेच धर्माचे आचरण,हीच धर्माची नीती.कर्मकांड केले,अंधश्रद्धा पाळल्या की , आपण नैतिक मार्गावर राहतो ,हीच धर्माची नैतिकता .हेच पुण्यकर्म.पुण्यकर्म म्हणजेच नीती.असे शिक्षण या पारंपरिक धर्माचे असते.जे धर्मग्रंथ,पोथी पुराणातून , कथा द्वारे सांगितले जाते.
थोडक्यात काय तर,धर्माचे कर्मकांड म्हणजे पुण्य,आणि पुण्य म्हणजेच नैतिकता.आणि नैतिकता म्हणजेच धर्म.अशी ही धर्माची व्याख्या करतात,धर्माचे संस्कार म्हणजेच देवाची आराधना,कर्मकांड होय.
धर्माचा माणसावर बिम्बलेला संस्कार पहिला.आता संस्काराचा धर्म म्हणजे काय ? हे पाहू.त्या आधी संस्कार म्हणजे काय ? हे पाहणे जरुरीचे आहे.संस्कार पासून संस्कृती निर्माण होते, संस्कार म्हणजे आचरण,व्यवहार.आपण आपल्या जीवनात जे आचरण करतो,उदा.काय बोलतो ? कसे वागतो ? काय खातो ? काय पितो? आपली वेश भूषा केस भूष,आपले विचार वर्तन,कुणाशी मैत्री ? आपण काय गातो? कोणते भजन पूजन करतो ? खोटे बोलतो की खरे ? दारू पितो की दूध ? चोरी करतो का ? पर स्त्री सोबतचे आपले वर्तन कसले ? या सर्व गोष्टी म्हणजे संस्कार होय.संस्कारात धार्मिक सामाजिक आर्थिक राजकीय सर्वच विषयाचा समावेश असतो.अगदी आध्यात्मिक सुद्धा.असा हा संस्कार.
संस्काराचा धर्म काय असला पाहिजे ? संस्काराचा धर्म म्हणजे स्वातंत्र्य होय.धर्म हे नियमाने बांधलेले असतात,तेथे स्वातंत्र्य नसते.कारण धर्माच्या नियमानुसारच वागावे लागते,व्यवहार करावा लागतो.प्रत्येक धर्माचे संस्कारा नुसारच वागणे बंधन कारक असते.त्यालाच धर्माचा संस्कार म्हणतात.पण संस्काराचा धर्म मुळात स्वातंत्र्य” हाच आहे.कारण निसर्गतः माणसाला स्वातंत्र्याची गरज वाटते,प्रेम करावेसे वाटते,मैत्री कराविशी वाटते,आपणास न्याय मिळावा वाटतो,शांतीमय जीवन जगावेसे वाटते.प्रत्येक मानवाची ही मौलिक आवश्यक गरज आहे,म्हणून यासाठी स्वातंत्र्य हवे,” मला माझ्या मनाप्रमाणे आणि विचारानुसार खाण्यापिण्याचे ,इतरांशी मैत्री करण्याचे ,पोशाखाचे , विचार आणि अभिव्यक्ती आणि संचाराचे स्वातंत्र्य हवे,असे वाटणे म्हणजेच संस्काराचा धर्म होय.अर्थात माझ्यामुळे कुणास त्रास न होता मला स्वातंत्र्याचा उपभोग आणि आनंद घेता आला पाहिजे,असे विचार आणि अशी व्यवस्था असणे म्हणजेच संस्काराचा धर्म होय.यास संस्कारधर्म म्हणता येईल.संस्कार स्वातंत्र्य म्हणजेच संस्कारधर्म होय.संस्काराचा धर्म होय.
आणि संस्काराचा धर्म पाळता येत नाही,अशा व्यवस्थेत किंवा धर्मात राहणे म्हणजेच कारागृहात राहण्यासारखे आहे.माणूस म्हणजे लहान मुले नव्हेत,त्यांना बंधनात ठेवायला .21 वर्षाच्या माणसाचा मेंदू पूर्ण विकसित झालेला असतो,म्हणून प्रत्येकाने बुद्धिवादी तर्कनिष्ठ सत्यनिष्ट न्यायप्रिय बनले पाहिजे,धर्माच्या बंधनात राहून धर्माचे संस्कार संस्कृती याची चिकित्सा केली पाहिजे.त्यातील श्रद्धा अंधश्रद्धा ,निती अनीती,न्याय अन्याय तपासले पाहिजेत,मानवी मूल्य म्हणजे स्वातंत्र्य समता समानता बंधुता न्याय ,प्रेम,क्षमा, दया,अहिंसा ,शांती याचा शोध घेतला पाहिजे,ही मूल्य ज्या धर्मात नाहीत त्या धर्मात आणली पाहिजे.किंवा त्या धर्माचा त्याग केला पाहिजे.आणि संस्काराचा धर्म पाळला पाहिजे.


