ऋषी सहारे
संपादक
गडचिरोली, : रब्बी पणन हंगाम २०२४-२५ अंतर्गत शेतकऱ्यांकडून धान्य व भरडधान्य खरेदी प्रक्रियेसाठी शासनाने दिलेली अंतिम मुदत आता २० जुलै २०२५ पर्यंत वाढविण्यात आली आहे.
अनेक शेतकऱ्यांची खरेदी BeAM (Buyer and Agricultural Market) पोर्टलवरील तांत्रिक अडचणीमुळे प्रलंबित राहिल्याने शासनाने धान खरेदीसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.
शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपली धान्य विक्रीची नोंद पूर्ण करावी, तसेच जिल्ह्यातील सहकारी संस्था, खरेदी केंद्रे आणि संबंधित यंत्रणांनीही या मुदतीचा लाभ घेऊन खरेदी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तत्काळ करावी, असे जिल्हा पणन अधिकारी यांनी कळविले आहे.


