दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी देवाची : श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था, आळंदी देवाची यांच्या वतीने गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने “गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ” गुरुवार, दि.१० जुलै रोजी सकाळी १० वाजता शेठ कान्तीलाल नंदराम चोरडिया सांस्कृतिक सभागृह, श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, आळंदी देवाची येथे उत्साहात पार पडणार आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ह.भ.प. शेखर महाराज जांभुळकर भूषवणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून भाऊ भगवंत कड, प्रदीप वळसे पाटील उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमात वर्षभरात शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान प्रशस्तीपत्र, भेटवस्तू आणि रोख रकमेद्वारे करण्यात येणार आहे.
या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर, उपाध्यक्ष विलास गो.कुऱ्हाडे, सचिव अजित वडगावकर, खजिनदार डॉ.ज्ञानेश्वर पाटील, तसेच विश्वस्त पांडुरंग कुऱ्हाडे, प्रकाश काळे, लक्ष्मण घुंडरे, मुख्याध्यापक सूर्यकांत मुंगसे, प्रदीप काळे यांच्यासह पालक शिक्षक संघाचे पदाधिकारी कृष्णा म. शेळके आणि डॉ.विवेक चव्हाण हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमास सर्व पालक, शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे सचिव अजित वडगावकर यांनी केले आहे.



