Home Social ग्राहक हितासाठी सर्पमित्रांची नाव व संपर्क क्रमांकाची यादी नागपूर जिल्ह्यात लागू शकते...

ग्राहक हितासाठी सर्पमित्रांची नाव व संपर्क क्रमांकाची यादी नागपूर जिल्ह्यात लागू शकते तर इतर जिल्ह्यांत कां नाही?दीपक देशपांडे अध्यक्ष जागृत ग्राहक राजा नागपूर विदर्भ प्रांत यांची विचारणा….

     रामदास ठुसे 

नागपूर विभागीय प्रतिनिधी 

नागपूर :- पावसाळा सुरू झाला की पाताळात राहणारे सर्पादी प्राणी पृथ्वीतलावर येतात आणि मनुष्य प्राण्याला दंश करतात परिणामी मोठ्या प्रमाणात वेळेवर औषधोपचार झाला नाही तर मनुष्य प्राणी आपला जीव गमावतात.

       कधी कधी त्या दंश झालेल्या मनुष्याला दवाखान्यात दाखल करायला उशीर होतो तर कधी दवाखान्यात दाखल करुनही योग्य माहितीच्या व उपचारा अभावामुळे औषधोपचार करताना केलेल्या दिरंगाई मुळे सुद्धा प्राण गमवावे लागतात,हे प्रकार ग्रामीण भागापासून तर शहरी भागापर्यंत सर्वदूर अनुभवायला मिळतात. त्यामुळे मनुष्याला प्राणही गमवावे लागतात, आणि त्यानंतर नातेवाईक आणि वैद्यकीय अधिकारी याच्यात मोठे वादही होतात.

         हे वाद होऊ नये यासाठी वैद्यकीय अधिकारी यांचे सोबतच त्या परिसरात कार्यरत प्रशिक्षित सर्पमित्र यांची नावे व संपर्क क्रमांक आरोग्य विभागाच्या वतीने प्राथमिक स्वास्थ्य केन्द्र व उपजिल्हा रुग्णालय परिसरात ठळक अक्षरात लिहून ठेवायला हवी.