Home Breaking News ब्रेकिंग न्यूज.. — आपने वाहिली बाबूपेठ येथील रस्त्यांवरील खड्ड्यांना श्रध्दांजली!..  ...

ब्रेकिंग न्यूज.. — आपने वाहिली बाबूपेठ येथील रस्त्यांवरील खड्ड्यांना श्रध्दांजली!..  — ठिक ठिकाणी खड्डेच खड्डे!..

शुभम गजभिये 

  विशेष प्रतिनिधी..

       चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या बाबूपेठ परिसरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर प्रभाग, जो की दलित वस्ती म्हणून ओळखला जातो, या ठिकाणी मलनिसारण योजनेच्या अंतर्गत सुरू असलेले काम अत्यंत हलक्या दर्जाचे व निष्कृष्ट पद्धतीने केले जात असल्याची प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.

          या योजनेमुळे संपूर्ण रस्ते खड्ड्यांनी भरले असून नागरिकांना अत्यंत गंभीर समस्यांचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावर पडलेल्या खोल खड्ड्यांमुळे अनेक लहान-मोठे अपघात झाले आहेत. पावसाळ्याच्या काळात हे खड्डे पाण्याखाली जाऊन अधिक धोकादायक ठरत आहेत. नागरिकांच्या वारंवार तक्रारी असूनही महानगरपालिका प्रशासन या समस्येकडे दुर्लक्ष करीत आहे.

       आज या अन्यायकारक व बेजबाबदार वागणुकीविरोधात आम आदमी पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे यांच्या नेतृत्वात नागरिकांना सोबत घेऊन खड्ड्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या अनोख्या आंदोलनाच्या माध्यमातून नागरिकांनी आपल्या मनातील संताप व्यक्त केला.

       खड्यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात घालणाऱ्या कंत्राटदाराची चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे.”अशी मागणी देखील या निमित्ताने करण्यात आली.

       या आंदोलनात आपचे प्रदेश सहसचिव सुनील मुसळे, जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे, शहराध्यक्ष योगेश गोखकरे, संघटन मंत्री संतोष बोपचे, बाबूपेठ अध्यक्ष राजू तोडासे, अनुप तेलतुंबडे, मनीष राऊत, अजय बाथव, एकनाथ कसारे, रजनी गड्डेवार, किरण कुमरवार आदिं कार्यकर्ते तथा स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

       महानगरपालिकेच्या कामकाजाविरोधात स्थानिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.