शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी…
विदर्भाच्या चंद्रपूर जिल्हातंर्गत जिवती,कोरपना व राजूरा तालुक्यातील काही पटवारी मुख्यालयाला नियमित उपस्थित राहात नाही.त्यामूळे शेतक-यांना बराच ञास सहन करावा लागत आहे.
जिवती,पोंभुर्णा आणि राजूरा तालुक्यातील काही पटवारी आठवड्यातून फक्त एक दोन दिवसच मुख्यालयी राहत असल्याचा आरोप आदिवासी नेते तथा नागविदर्भ आदिवासी महासंघाचे अध्यक्ष वामन आत्राम यांनी केला आहे.
बॅकेतून पिक कर्ज घेणे,उत्पन्न दाखला घेणे आदिं आवश्यक कामे पटवारी वर्गांकडे राहत असल्याचे आत्राम यांचे म्हणणे आहे.
ते शेतकऱ्यांना वेळेवर मिळत नाही.यामुळे विनाकारण शेतकऱ्यांसह सर्व सामान्य जनतेला नाहक त्रास करावा लागत आहे.त्यांनी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
उद्या ते चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.अशोक उईके यांची या संदर्भात भेट घेणार असल्याचे त्यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.



