शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी…
भद्रावती नगरीत दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील” भद्रावती” मोहरम बहुउद्देशीय उत्सव समिती तर्फे दि. 06 जुलै 2025 ला सायंकाळी 5 ते रात्रौ 10 वाजे पर्यंत स्थानिक गांधी चौकात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण परिसरात विद्युत रोशनाई – पताका – स्वागत गेट आदिंनी सजावट करण्यात येत आहे.

अनेक जाती धर्माचे लोक मोहरम निमित्त या नगरीत दर्शनासाठी येत असतात.दरम्यान शहरातील विविध सामाजिक संघटने मार्फत शरबत – लंगर ,मिठाई ,प्रसाद ,व पिण्याच्या पाण्याचे वितरण होत असते. व्यापारी संघटना व भद्रावती पत्रकार संघ व अन्य सामाजिक संघटनांचा या कार्यक्रमात सहभाग राहत असतो.
भद्रावती तालुक्यातून – शहरातून व प्रत्येक वार्डा – वार्डातून सवऱ्या – ख्वाज्या – ताजे – पंजे – डोले गांधी चौकात एकत्र येऊन भेटी गाठी घेतात व याला जत्रेचे स्वरूप येत असते गेल्या 20 वर्षांपासून सदभावना – भाईचारा – कौमी एकता – देशभक्ती – शांतता कायम ठेवण्याचे कार्यक्रम समिती मार्फत होत असते.

मोहरमची 1 ली ला मोहरमची सुरुवात होते . मोहरमच्या 4 थी ला मोहरमच्या 5 वि ला सवाऱ्याची स्थापना होत असते. मोहरमच्या 7 वि ला मोहरमच्या 9 वि ला रात्रो सवाऱ्या व ख्वाज्या हे प्रत्येक दरग्यावर भेटी गाठी घेत असतात मोहरमच्या 10 वि ला मोहरमची सांगता गांधी चौक येथे होते.
आयोजित या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन उमेश रामटेके, राजू गैनवार, अनिल धानोरकर ,रब्बानी शेख निलेश पाटील , प्रफुल चटकी जावेद शेख , सागर जट्टलवार ,प्रशांत बदखल ,जगन दानव , ऍड सुनील नामोजवार ,दिलीप ठेंगे, दिलीप मांढरे, विनायक येसेकर, खेमचंद हरीयानी ,विलास गुंडावार ,बाळू उपलंचीवार ,संजय बॅनर्जी ,प्रकाश पिंपळकर आदिंनी केले आहे.



