ऋषी सहारे
संपादक
गडचिरोली, : राज्य शासनाच्या सहकार विभागाकडून २०२१ ते २०२४ या कालावधीत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सहकारी संस्थांना गौरविण्यासाठी सहकार पुरस्कार वितरणाचा कालबध्द कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्कारांसाठी इच्छुक संस्थानी १८ जुलैपर्यंत सबंधित तालुका सहाय्यक निबंधक किंवा उपनिबंधक कार्यालयात अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
या पुरस्कारांतर्गत एकूण ४५ संस्थाना पुरस्कार दिले जाणार आहेत. त्यामध्ये सहकार महर्षी पुरस्कार एक (संस्था १ लाख रुपये), सहकार भुषण पुरस्कार महिलांचा कोणत्याही विभागाशी संबंधित वैयक्तिक समस्या, गाऱ्हाणी, अडी अडचणी ऐकुण त्यांचे अर्ज स्विकारण्यात येईल. परंतु न्याय प्रविष्ठ प्रकरणे, सेवा विषयक व आस्थापना विषयक बाबी विहित नमुन्यात नसलेले किंवा आवश्यक कागदपत्रे न जोडलेले अर्ज स्वीकृत करण्यात येणार नाही. कृपया याची नोंद घ्यावी. तसेच अर्ज हे वैयक्तिक स्वरुपाचे असावेत.
अर्जाचा नमुना जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, गडचिरोली, बॅरेक क्रमांक १, खोली क्रमांक २६, २७ कॉम्पलेक्स, गडचिरोली या कार्यालयात निःशुल्क प्राप्त होईल. अर्ज १५ दिवसा आधी दोन प्रतीत सादर करावे. तरी दिनांक २१ जुलै २०२५ रोजी सोमवारी सकाळी ११.०० वा. जिल्हा महिला लोकशाही दिनाची सभा आयोजित करण्यात आलेली आहे.
तरी सर्व पीडित/समस्याग्रस्त महिलांनी आपले अर्ज सदर कार्यालयात सादर करावे, याबाबत सर्व महिलांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, गडचिरोली यांनी केले आहे.


