दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
पुणे : आषाढी एकादशीपूर्वी मोठ्या भक्तिभावाने वारीतून पंढरपूरात जमणाऱ्या लाखो वारकरी बंधू भगिनींना उपलब्ध करून देण्यात आलेल्या सोयीसुविधांचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते यादरम्यान व्हीआयपी प्रोटोकॉल बाजूला सारून मंदिरात नतमस्तक होत विठ्ठल रखुमाईचे मनोभावे मुखदर्शन घेतले.
यानंतर मंदिर परिसरात सुरू असलेल्या कामांची आणि दर्शनासाठी केलेल्या सोयी सुविधांची माहिती घेतली. मंदिरातून बाहेर येताच हजारो वारकऱ्यांच्या गर्दीत मिसळून त्यांच्याशी संवाद साधला. वारीनिमित्त केलेल्या सुविधा पुरेशा आहेत की नाही याची सविस्तर माहिती घेतली. तसेच विठुरायाच्या चरणी लीन होण्यासाठी आलेल्या या वैष्णवांच्या मेळ्याला वंदन यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केले.
यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, आमदार समाधान अवताडे, आमदार राजू खरे, सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, धर्मवीर आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले, उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रे, सोलापूर संपर्कप्रमुख महेश साठे तसेच महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.



