शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
चंद्रपूर जिल्ह्याचे नवीन अप्पर पोलिस अधिक्षक इश्वर कातकाडे यांचा आज पो़लिस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्य शाखा चंद्रपूरच्या वतीने सत्कार करण्यात आला. कातकडे यांनी संघटनेच्या कार्याला या प्रसंगी शुभेच्छा व शुभकामना दिल्या.
कार्यक्रमाला पोलिस बॉईज असोसिएशनचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा चंद्रपूर जिल्हाध्यक्ष, भुवणेश्वर पद्माकर निमगडे,महिला जिल्हा अध्यक्षा राजश्री गेडाम, महिला जिल्हा उपाध्यक्षा शकुंतला शेडमाके, शहर उपाध्यक्ष राजु प्रसाद आदि संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.



