Home Social सदैव धडपडणारी चंद्रपूरची समाजसेविका रंज्जू मोडक!.. — अनेक सामाजिक व धार्मिक...

सदैव धडपडणारी चंद्रपूरची समाजसेविका रंज्जू मोडक!.. — अनेक सामाजिक व धार्मिक कार्यात पुढाकार!.. — गत वर्षी लोकहितचा कर्तृत्ववान महिला सन्मान पुरस्कार बहाल!…

शुभम गजभिये 

  विशेष प्रतिनिधी 

        मनात उच्च शिक्षणाची आवड, कलाक्षेत्रात पुढे जाण्यासाठी धडपड व समाजसेवा करण्याची मनस्वी इच्छा! ही भावना रंज्जू दिलीप मोडक हिने महाविद्यालयीन जीवनापासून मनाशी जपली होती. विवाह नंतर ती ग्रामीण भागातून शहरी भागाकडे वळली व मग ख-या अर्थाने तिची समाजसेवा प्रारंभ झाली.ती एक उत्तम योग शिक्षिका आहे.शांत व प्रेमळ स्वभावामुळे तिची मैत्रीणींत फार लोकप्रियता आहे.याच मनमिळाऊ स्वभावामुळे ती आज महाराष्ट्रातील सहज सुचलं व्हाॅट्सअप गृपची एक मुख्य संयोजिका आहे.

        सलग चार वर्ष सहज सुचलं महिला व्हाॅट्सअप गृपची संयोजिका म्हणून जबाबदारी सांभाळणारी ती एकमेव आहे हे विशेष!

      नूपुर दिलीप मोडक ही त्यांची लाडकी कन्या!

       रंज्जूच्या मार्गदर्शनाखाली ती एक उत्तम चित्रकार बनली.सध्या तिचं वास्तव उच्च शिक्षणासाठी मुंबईत आहे.नूपूरने आपल्या कलेतून आईचे हुबेहूब छायाचित्र रेखाटले असून ती भविष्यात अधिक लक्षवेधक चित्रे रेखाटतील अशी तिच्या कुटुंबीयांना पूर्णतः खात्री आहे.

        रंज्जू यांचे सहज सुचलंसह शहरातील अनेक सामाजिक व धार्मिक कार्यक्रमात आज पर्यंत अमुल्य व मोलाचे योगदान ठरले आहे.गत वर्षी ती मूल नगरीच्या पत्रकार भवनात पार पडलेल्या एका भव्यदिव्य कार्यक्रमात कर्तृत्ववान महिला सन्मान पुरस्काराची मानकरी ठरली होती.हा भव्य सोहळा मूलचे समाजसेवक दत्तात्रय समर्थ व अर्चना समर्थ यांनी लोकहितच्या माध्यमातून आयोजित केला होता.

         या कार्यक्रमाला खुद्द सहज सुचलंच्या मुख्य मार्गदर्शिका जेष्ठ साहित्यिक अधिवक्ता मेघा धोटे, सहसंयोजिका नलिनी आडपवार, चंदा कामडी, समता बन्सोड, फर्जना शेख, अर्चना समर्थ, कवयित्री शैला चिमड्यालवार प्रामुख्याने उपस्थित होत्या.