शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी…
चंद्रपूर :- अभ्यासासोबतच पत्रकारिता क्षेत्रातही कु.स्नेहा मडावी हिने आपला एक वेगळा ठसा उमटविला आहे.ती मुळची विदर्भाच्या चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील एका छोट्याशा गावची!
गत चार वर्षांपूर्वी तिने पत्रकारिता क्षेत्रात आपले पाऊल टाकले.सध्या ती पुणा येथे पिएचडी करीत असून मराठी हिंदी इंग्रजी भाषेवर तिचे प्रभुत्व आहे.
स्थानिक वृत्तपत्रातून तिने आपल्या लिखाणाला सुरुवात केली.आज ती पुण्याच्या एका न्यूज चैनलला निवेदिकाची जबाबदारी पार पाडत आहेत.वडीलांचे छत्र हरपल्या नंतर तिने पुणे गाठले तिथेच तिने आपलं शिक्षण पूर्ण केले.अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत असतांना स्नेहाने हिंमत हारली नाही.शिक्षणाला अधिक महत्त्व दिले.
गत वर्षी मूल नगरीच्या पत्रकार भवनात थाटात पार पडलेल्या एका शानदार सोहळ्यात तिला लोकहितचा महिला कर्तृत्ववान सन्मान पुरस्कार बहाल करण्यात आला.हा पुरस्कार दत्तात्रय समर्थ व समाजसेविका अर्चना समर्थ यांच्या हस्ते तिने स्वीकारला!
स्नेहा ही महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंची गत पाच वर्षांपासून एक सदस्य आहेत.नवोदित तरुणींना ती प्रेरणादायी आहे.सातत्याने तिचं लिखाण कार्य सुरू असते.मायाताई कोसरे व मेघा धोटे तिच्या उल्लेखनीय कार्याचे नेहमीच गोडवे गात असते.



