शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी…
उपराजधानी नागपूरच्या समाजसेविका व योग शिक्षिका मायाताई कोसरे यांनी नुकताच किरण दिप या नावाने विदर्भातील महिला व तरुणींसाठी एक व्हाट्सअप गृप प्रारंभ केला आहे.
या गृपची आजची सभासद संख्या तिनशेच्यावर असल्याचे या प्रतिनिधीशी नागपूर मुक्कामी बोलताना मायाताई कोसरे यांनी सांगितले.
विदर्भातील महिला व तरुणींच्या कलागुणांना वाव व प्रोत्साहन मिळावे हा मुळ उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्यांनी किरण दिप गृपची निर्मिती केली.यात विदर्भातील अनेक कर्तृत्ववान महिला व युवतींचा समावेश आहे.
दरम्यान या गृपच्या मुख्य मार्गदर्शिका कोसरे यांनी किरण दिपच्या मुख्य सहसंयोजिका म्हणून बल्हारपूर नगरीच्या उच्च शिक्षित श्रध्दा पलाश् परिमल यांची आज नियुक्ती केली.
परिमल यांच्या नियुक्तीचे चंद्रपूरच्या जेष्ठ लेखिका मृणाल कांबळे, वास्तुविशारद शिवानी झाडे, प्रियंका गायकवाड,दिशा ठाकरे, राजूराच्या जेष्ठ साहित्यिका अधिवक्ता मेघा धोटे, किनवटच्या कला शिक्षिका साक्षी वाडगूरे, मुंबईच्या प्रख्यात चित्रकार नूपुर मोडक राजूराच्या चित्रकार रश्मि पचारे या शिवाय चंद्रपूरच्या विद्या पिंजरकर योगशिक्षिका रंज्जू दिलीप मोडक, मीनाक्षी गुजरकर, कोकिळा पोटदुखे कविता जुमडे, संजीवनी धांडे सविता कोट्टी, वैजयंती गहुकर साधना धकाते , शैला चिमड्यालवार सीमा पाटील, प्रियंका बेन्द्रे, प्रियंका आत्राम, प्रांजली दिकोंडवार,मूलच्या समाजसेविका चंदा कामडी, श्वेता मंडलवार, गायत्री श्रीरामे, प्रांजू मखरे,अर्चना समर्थ, नलिनी आडपवार , डॉ.सुचिका बुक्कावार, अपर्णा चिडे,अधिवक्ता हिमानी वाकुडकर, श्वेता मंडलवार सावलीच्या कवयित्री शैला चिमड्यालवार, गडचिरोलीच्या ॲड.कविता मोहरकर, मनिषा मडावी, नागपूरच्या प्रा.वैशाली राऊत ,पुण्याच्या पत्रकार स्नेहा मडावी ठाण्याच्या सुपरिचित कवयित्री मंगल मिसाळ नाशिकच्या समाजसेविका चैताली आतराम , अंजली इटनकर, अधिवक्ता सारिका टेंभरे,आदिंनी स्वागत केले आहे.



