Home Social परिस्थितीवर मात करण्यासाठी मूलच्या समाजसेविका नलिनीताई आडपवारांची धडपड अद्यापही सुरूच! 

परिस्थितीवर मात करण्यासाठी मूलच्या समाजसेविका नलिनीताई आडपवारांची धडपड अद्यापही सुरूच! 

शुभम गजभिये 

विशेष प्रतिनिधी..

     चंद्रपूर:- परिस्थितीवर मात करण्यासाठी आजही नलिनीताई आडपवारांची दिवसरात्र धडपड सुरूच आहे.एक दिवस निश्चित यश मिळेल अशी मूलच्या समाजसेविका नलिनी दिनेश आडपवार यांना आशाच नाही तर पूर्णतः खात्री आहे.

       त्यांचे शिक्षण बिए.आयटीआय(ड्रेस डिझायनिंग) पर्यंत झालेले!…

      विविध क्षेत्रात काम करण्याचा तिचा दांडगा अनुभव,जीवनावर आईचा प्रभाव,चिमूर गावी तिचा जन्म!आई मनोरुग्ण असल्यामुळे विविध ठिकाणी राहण्याचा तिला योग आला.

        त्यात प्राथमिक शिक्षण त्यांचे पुणे व जळगाव जिल्ह्यात झाले.नंतर चंद्रपूर जिल्ह्यात झाले!त्यांनी काही काळ मराठवाड्यात सुद्धा घालविला…

      शैक्षणिक क्षेत्रात असतांनाच नलिनीताईला प्रत्येक भागातील पदार्थ करण्याचा अनुभव होता व या अनुभवाला अनुसरून आवड निर्माण झाली होता.सर्वांच्या स्वभावाशी जोडून घेण्याचा अनुभव देखील आला होता.

       लोकांत मिसळणे,नवीन लोकांची ओळख करणे ,नाविन्यपूर्ण पदार्थ करणे या सर्व गोष्टी आईकडून तिला शिकायला मिळाल्या. 

        वडील शिक्षक असल्यामुळे घरी थोडंफार शिस्तीचं वातावरण होतं!,परंतु त्या शिस्तीत माणुसकी दडून होती.शिकता शिकता तिला बाबांनी आयटीआय मध्ये प्रवेश दिला.त्यांना नको असलेल्या विषयात ते ही ड्रेस डिझाईन मध्ये! 

        लग्न झाल्यानंतर त्या कोर्सनिच त्यांच्या संसाराला काहीसा हातभार लागला,उदरनिर्वाह सुरू झाला. त्यांच्या जीवनात खूप समस्या निर्माण झाल्या,पण खरी साथ दिली त्यांना जीवन साथी असलेल्या मिस्टरांनी!

       त्यांनी तिच्यावर विश्वास टाकला! त्यामुळे त्या आज एक कर्तृत्ववान महिला घडल्यात…त्यासाठी त्यांची भूमिका ही महत्वाची ठरली …

       समाजकारण करण्याची शालेय जीवनापासूनच आवड,लग्न झाल्यानंतर त्या रात्रीची शाळा शिकवायला लागल्यात.जी मुले दिवसा कामाला जात होती त्यांना त्या रात्रपाळीला शाळेत शिकवून चौथ्या वर्गाची परीक्षा उत्तीर्ण करायला लावत होत्या.

      त्यात शीख समुदायाच्या मुलांची संख्या सर्वाधिक होती.भरपूर मुले होती,पैसा मिळत नव्हता,परंतु त्यांना खुप आनंद व सात्विक समाधान वाटायचे!

        आज तिच मुले मोठी होऊन कुठं भेट झाली तर तिच्या पाया पडतात.तेव्हा तिला अक्षरशः धन्य वाटते.गेली १५ वर्षांपासून त्यांचे महिला सक्षमीकरण कार्य सुरू आहेत!

       बचत गटांच्यामध्यमातून महिलांच्या बऱ्याच समस्या त्यांनी जवळून बघितल्या.महिला भगिनींना आपलं मानून त्यांच्याशी हितगुज करतात तेव्हा ही त्यांनाही बरं वाटत.किशोरी वर्ग चालविले,महिला मासिक पाळी वर्ग भरवून महिलांना योग्य मार्गदर्शन केले.हे सर्व करतांना सामाजिक कार्यात त्यांना मूल गौरव पुरस्कार मिळाला.त्यांना नेहमीच सकारात्मक जगायला आवडते.नवीन लोकांशी ओळख,नाविण्यपूर्ण शिकणे.आणि रेडिओवरील गिते,मुलाखती ऐकणे आवडते…

        वाचन हा त्यांचा आवडता छंद! कधी कधी त्या थोडं फार लिहतातही !त्यांची आई कविता लिहायची.! त्या सर्व गुण आई कडून घेवू शकल्यात! पद्मशाली समाजाचे विदर्भ उपाध्यक्ष पद,काँगेस महिला शहराध्यक्ष पदांसह अनेक जबाबदाऱ्या त्यांच्याकडे आहे.

     अश्यातच त्या समाजसेविका मायाताई कोसरे,अधिवक्ता मेघा धोटे,साधना धकाते,शैला चिमड्यालवार,संजीवनी धांडे,अधिवक्ता अंजली गुंडावार,विजया भांगे,विजया तत्वादी,रजनी रणदिवे यांच्या महाराष्ट्रातील नामवंत,”सहज सुचलंची,एक सहसंयोजिका म्हणून गेल्या काही वर्षांपासून आपली जबाबदारी पार पाडत आहेत.

       साधा स्वभाव असल्यामुळे मुळे बरेचदा संकट आली.व्यवसायातही अपयश आले.परंतु हिंमत न हारता परत उभे राहणे हीच त्यांची सर्वात मोठी शक्ती आहे.

       सहज सुचलं गृपच्या माध्यमातून मला खूप सार्‍या गोड मैत्रिंणी मिळाल्या असं त्या नेहमी सांगतात! 

       राजकीय क्षेत्रात येण्याचं कारण म्हणजे महिलांसाठी काहीतरी मोठं कार्य हातून घडावं हिच त्यांची एक प्रामाणिक इच्छा आहे! 

      कोसंबीची सुपरिचित समाजसेविका चंदा कामडी व समता बन्सोड यांची त्या जिवलग मैत्रिण आहेत.अश्या कर्तृत्ववान नलिनीताईंची धडपड अजूनही संपलेली नाही.