ऋग्वेद येवले
उपसंपादक
दखल न्यूज भारत
साकोली : “मतदारांना आवाहन, यावेळी पदवीधर सुशिक्षित नगरसेवक पाहिजे, अशिक्षित लोकांना पुन्हा चान्स देऊन आपली नगरपरिषद पुन्हा अशिक्षित बनवू नका, नगरसेवक हा फक्त ठेकेदारी करणारा नसावा कारण भ्रष्टाचारांची कितीतरी प्रकरणे येथे घडली” या भाषेत आता साकोली सेंदूरवाफा शहरातील जागरूक मतदार जनतेने “सोशल मिडीया” द्वारे आपली भूमिका स्पष्टपणे मांडायला सुरुवात केली आहे. या संतप्त प्रकाराने यावेळी मतदार जनता स्वच्छ पारदर्शक मनाचा, शिक्षित आणि ज्यावर भ्रष्टाचाराचा एकही डाग नसलेला युवा नगरसेवक नगरपरिषदेत पाठविण्याच्या तयारीत येथील सर्व जनता एकवटून गेले आहे हे विशेष.
सध्या काही सोशल मिडीयातून मतदार जनतेने आतापासूनच आपले स्टेटमेंट देण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये ( शुक. २७ जून ) रात्री ०९:५९ ला एका शिक्षित मतदाराने लिहून पाठविले की, “मतदारांना आवाहन यावेळी पदवीधर सुशिक्षित नगरसेवक पाहिजे, अशिक्षित लोकांना पुन्हा चान्स देऊन आपली नगरपरिषद पुन्हा अशिक्षित बनवू नका” तर एका जागृत मतदार सामाजिक कार्यकर्त्याने स्टेटमेंट दिले की, “नगरसेवक हा फक्त ठेकेदारी करणारा नसावा, नाही तर एखादा काम पूर्ण नाही झाले तरीही त्या कामाचे बोगस बिले काढले जातात, एखाद्या जून्या नालीला थोडं पॉलिश मारून तिला नविन करून बिल काढणे असे कितीतरी प्रकरणे साकोलीत घडलेली आहेत” या रोखठोक भाषेत आता जागृत जनता समाजमाध्यमांवर लिहून आपला राग व्यक्त करीत आहेत. म्हणजेच मागील मागील २०१७ पासून किती जनविकास पैशाची अफरातफरी माजवून ठेवली असेल हेच आता समोर येणे गरजेचे झाले आहे असे निदर्शनास येत आहे. शुक्रवारी सकाळी १०:२१ ला भारतीय स्टेट बँक समोर एक जागृत मतदार “साकोली मिडीया” शी बोलून दाखवले की, “भैया जरा इन अनपढों को नगरपंचायत मौदा सिटी ही देख कर आओं बोलना, वहा केवल नगरपंचायत होकर कैसा शानदार आलीशान विकास हुआं है, और यहाँ देखो आजतक एक पेशाबघर रोड पर बनाने की औकात नहीं, मैं इनसे डरता नही हुं, क्युं की मैने इनको स्मार्ट शहर के नाम पर वोट दिया था और मतदारों के साथ ही इन्होने धोखाधढी की है” या निर्भिड शब्दात आता येथील जागृत झालेली जनता रस्त्यावर बोलत आहे आणि सोशल मिडीयातून आपली रोखठोक प्रतिक्रिया लिहून आपल्या शहरातील अविकासाचा भयंकर राग काढीत आहेत.
यावरून असे सिद्ध होते की, साकोली सेंदूरवाफा नगरपरिषद झाल्यापासून काहीच विकास न करता मतदार जनतेच्या विकासशिल पैशाची निधीची कशी अफरातफरी उधळपट्टी करून ठेवली आहे याचे जिवंत उदाहरण आज सर्वत्र सोशल मीडियातून समोर आले आहे. तर काही सुजाण महिलांनी बोलले की यावेळी नगराध्यक्ष व नगरसेवक हे स्वच्छ पारदर्शक, युवा शिक्षित आणि त्यावर एकही भ्रष्टाचाराचा गैरव्यवहाराचा कमिशन लाटण्याचा डाग नसलेला स्वच्छ प्रतिमेचा व्यक्तींनाच यावेळी भरघोस मतांनी निवडून आणू अश्या प्रतिक्रिया साकोली सेंदूरवाफा शहरातील प्रत्येक प्रभागात उमटत आहेत हे नक्की.



