शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी…
आम आदमी पार्टी चंद्रपूर महानगरच्या वतीने योगेश देवराव गोखरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे आज लेखी निवेदन सादर करून तुकूम प्रभाग क्र. 1 मधील महाडोळे यांच्या दुकानापासून तर श्रद्धा नगर बोर्ड पर्यंत आमदार यांच्या निधीतून PWD मार्फत तयार करण्यात आलेल्या सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या दर्जाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.
फेसबुक लाईव्हद्वारे सदरहू रस्त्याची तपासणी करताना, आम आदमी पार्टीने स्वतःच्या स्तरावर केलेल्या चाचणीमध्ये CC स्ट्रेंथ M30 ऐवजी M15 असल्याचे निष्पन्न झाले. हा प्रकार गंभीर असून संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
या बाबतीत गोखरे यांनी PWD ची अधिकृत टेस्टिंग टीम, संबंधित कंत्राटदार, आणि आम आदमी पार्टीचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत रस्त्याची पुन्हा चाचणी करण्यात यावी, आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
उपरोक्त निवेदनावर PWD विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी यावर त्वरित ॲक्शन घेण्यात येईल असे आश्वासन यावेळी दिले.
निवेदन देताना आम आदमी पार्टीचे पदाधिकारी मयूर राईकवार, योगेश देवराव गोखरे,राजू कुडे ,संतोष बोपचे,जितेंद्र भाटिया व आम आदमी पार्टीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
वेळ पडल्यास तीव्र आंदोलन करु :- योगेश गोखरेंचा प्रशासनाला इशारा
जनतेच्या पैशातून तयार होणाऱ्या विकासकामांमध्ये दर्जा महत्त्वाचा आहे. रस्त्याच्या गुणवत्तेवर तडजोड केली जाणार नाही. गरज पडल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशारा योगेश गोखरे यांनी प्रशासनाला दिला.



