अनिलकुमार एन.ठवरे
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
दखल न्युज भारत
देलनवाडी :- महिलांना आर्थिक,मानसिक व शारीरिक सबलीकरन करण्यासाठी उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये महिलांसाठी विविध योजना राबविल्या जातात,या विविध योजनावर विस्तृत चर्चा करण्यासाठी भरारी महिला प्रभाग संघ वैरागड – मानापूरच्या वतीने राजीव गांधी सभागृह देलनवाडी येथे वार्षिक अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले.
यामध्ये महिलांच्या शारीरिक आरोग्य विषयक बाबी तपासण्यासाठी आयुष्यमान भारत मंदिर देलनवाडी येथील डॉ. संजय सुपारे यांच्या मार्गदर्शनात त्यांच्या चमू मार्फत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. श्री.पुलगमवार व्यवस्थापक को ऑप बँक वैरागड यांनी महिलांना आर्थिक मार्गदर्शन व बँकेच्या विविध योजना विषयी माहिती दिली. त्याच बरोबर तालुका व्यवस्थापन कक्ष येथील पदाधिकारी आणि कर्मचारी यांनी ऑडिटवाचन,भविष्यकालीन नियोजन,महिला सक्षमीकरण, महिलांना उद्योग उभारण्यासाठी व शैक्षणिक कौशल्य विषयावर मार्गदर्शन केले.त्याच बरोबर महिलांच्या कलागुणाला वाव मिळावा यासाठी विविध कार्यक्रम घेण्यात आले.या प्रसंगी उत्कृष्ट ग्रामसंघाला तसेच वैयक्तिक पारितोषिक देण्यात आली.
वरील कार्यक्रमास अध्यक्षा म्हणून देलनवाडी ग्रा. पं. सरपंचा सौ. प्रियंकाताई कुमरे,प्रमुख अतिथी म्हणून सौ.मयुरीताई पेंदाम सरपंचा मानापुर,श्री.विनोद बोबाटे बी.एम.एम.,श्री.निकुरे बी.एम.एफ.आय.,श्री. बोदेले बी.एम.आय.एस,सौ. मोडक बी.एम.आय.बी.सी.बी, सौ.कविता झलके,श्री. प्रतिक लाऊडकर,श्री.गजभिये आय.एफ.सी,श्री.शेंडे सी.सी, प्रभाग संघाच्या अध्यक्षा सौ.अश्विनी ठवरे,सचिव सौ.सिंधुताई भानारकर व सर्व ग्रामसंघाचे पदाधिकारी,कृषी व्यवस्थापक सौ. पल्लवी कूमरे,पशू व्यवस्थापक सौ.सुश्मिता रणदिवे,सर्व कॅडर व महिला उपस्थित होत्या.
वरील कार्यक्रमाचे संचालन सौ.शालू वाढणकर आणि आभार प्रदर्शन कु.विद्याताई खडसे यांनी केले.
कार्यक्रमाची सांगता सर्व उपस्थितांना भोजन देऊन करण्यात आली.



