ऋग्वेद येवले
उपसंपादक
दखल न्यूज भारत
साकोली : भंडारा पवनी क्षेत्राचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या वाढदिवसानिमित्त ( २६ जून ) ला साकोली तालुका शिवसेना (शिंदे) तर्फे उपजिल्हा रुग्णालयात फळ वाटप कार्यक्रम करण्यात आला.
उपजिल्हा रुग्णालय साकोली येथे उपस्थित वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप गजभिये, डॉ. संतोष गाडगे यांच्या सोबत रुग्णांसबंधित चर्चा करण्यात आली व सोई- सुविधांचा आढावा घेण्यात आला.
याप्रसंगी शिवसेना पदाधिकारी राधेशाम मुंगमोडे, नरेंद्र वाडीभस्मे, सुमित लंजे, भागवत कापगते, अरुण राऊत, निशांत कुडेगावे, विवेक काशिवार, प्रेमराज सोनवाने, सचिन घोनमोडे, सचिन करंजेकर, निलेश मेश्राम, सुरेश गजापुरे, विजय लंडेकर, योगराज कुभरै, सिद्धार्थ बागडे, धम्मा वैद्य, महेंद्र जंनबंधु, प्रकाश चुन्ने, आत्माराम सोनकुसरे, विकास सहारे, रोहीत मेश्राम, नरेश कुंभरे, दिलीप कावळे, पुष्पा सोनकुसरे, प्रमिला गोटेफोडे, सरस्वता सहारे, सुनंदा कावळे, वनिता ठाकरे व साकोली तालुक्यातील मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.



