Home Social जगद्गुरु नरेंद्रचार्यजी महाराज यांच्या सामाजिक कार्याने प्रेरित होऊन शेवंता राघोर्ते यांनी केले...

जगद्गुरु नरेंद्रचार्यजी महाराज यांच्या सामाजिक कार्याने प्रेरित होऊन शेवंता राघोर्ते यांनी केले मरणोत्तर देहदान…

ऋग्वेद येवले

  उपसंपादक

दखल न्यूज भारत 

साकोली : जगद्गुरु नरेंद्रचार्यजी महाराज दक्षिणपीठ नाणिजधाम यांच्या सामाजिक कार्याने प्रेरित होऊन धानला येथील वृद्ध महिला स्व. शेवंता खुशाल राघोर्ते यांनी संस्थानला 121वे मरणोत्तर देहदान केले.

        लाखनी तालुक्यातील धानला/चान्ना या गावातील स्वर्गीय शेवंता खुशाल राघोर्ते (वय 79 )यांचे 20 जून 2025 ला वृद्धापकाळाने निधन झाले त्यांच्या इच्छेनुसार जगद्गुरु नरेंद्र महाराज संस्थानला देहदान करण्यात आले. जगद्गुरु नरेंद्रचार्यजी महाराज यांच्या सामाजिक कार्याने प्रेरित होऊन व यांच्या प्रेरणेने झालेले 121वे देहदान असून भंडारा जिल्ह्यातील पहिले मरणोत्तर देहदान आहे.

        स्व. शेवंता खुशाल राघोर्ते यांचे मरणोत्तर देहदान एन.के. पी. साळवे वैद्यकीय महाविद्यालय व संशोधन केंद्र आणि लता मंगेशकर हॉस्पिटल नागपूर येथे करण्यात आले आहे.

      यावेळी त्यांचे नातेवाईक मुलगा नत्थू राघोर्ते ,शास्त्री राघोर्ते मुलगी माया जगनाडे ,सुन ,जावई, नातवंड बराच परिवार तसेच पूर्व विदर्भ सहपीठ प्रमुख सुरेश लाखे, पीठ ब्लड इन नीड प्रमुख आशिष सोनी, भंडारा जिल्हा निरीक्षक संतोष भुरे, जिल्हाध्यक्ष नितेश वंजारी ,जिल्हा महिला अध्यक्ष वर्षा फंदे जिल्हा अध्यात्मिक प्रमुख मनोज तर्हेकर ,लाखनी तालुकाध्यक्ष विष्णुदास तळवेकर ,भंडारा जिल्हा कार्यवाहक श्रावण कोठेकर तसेच भंडारा जिल्हा सेवा समितीतील व लाखनी तालुक्यातील सदस्य उपस्थित होते.