Home Social सविता कोट्टींना पर्यावरण तर वंदना बरडेंना इंडियन एक्सलन्स पुरस्कार बहाल!.. —...

सविता कोट्टींना पर्यावरण तर वंदना बरडेंना इंडियन एक्सलन्स पुरस्कार बहाल!.. — अनेकांनी केले कोट्टी व बरडे यांचे अभिनंदन!..

शुभम गजभिये 

 विशेष प्रतिनिधी…

चंद्रपूरात नुकत्याच पार पडलेल्या पर्यावरण संमेलनात महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंच्या जेष्ठ सदस्य तथा समाजसेविका सविता सातपुते -कोट्टी यांना पर्यावरण संवर्धन व विकास समितीच्या वतीने पर्यावरण पुरस्कार बहाल करण्यात आला तर नागपूरच्या सामाजिक कार्यकर्त्या वंदना विनोद बरडे यांना हिंदी व मराठी पत्रकार संघाकडून इंडियन एक्सलन्स पुरस्कार देऊन मान्यवरांच्या उपस्थितीत गौरविण्यात आले.

      बरडे ह्या चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात अधीसेविका म्हणून कार्यरत आहे.

      कोट्टी व बरडे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंच्या मुख्य मार्गदर्शिका मायाताई कोसरे, अधिवक्ता मेघा धोटे, साधना धकाते, शैला चिमड्यालवार, अधिवक्ता अंजली गुंडावार, संजीवनी धांडे, रजनी रणदिवे, अपर्णा चिडे, चंदा कामडी, डॉ.सूचिका बुक्कावार आदिंनी त्यांचे अभिनंदन केले आहे.