Home Social “त्या”मृतक सानिका कुमरे व जखमी काजल आत्राम यांच्या कुंटूबाला मदतीचा हात द्या...

“त्या”मृतक सानिका कुमरे व जखमी काजल आत्राम यांच्या कुंटूबाला मदतीचा हात द्या :- अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेची मागणी! 

 शुभम गजभिये 

 विशेष प्रतिनिधी…

     चंद्रपूर शहरातील तुकुम परिसरात झालेल्या एका भीषण अपघातात नाहक सानिका कुमरे हिचा प्राण गेला तर तिची जिवलग मैत्रीण काजल आत्राम ही गंभीररीत्या जखमी झाली.तिला उठता बसता येत नसून ती आज बिछान्यावर पडली आहे.दोन्ही परिवाराची आर्थिक परिस्थिती अत्यंत वाईटच!  

     उच्च शिक्षण देवून मुलींना चांगली शासकीय नोकरी मिळावी अशी त्या कुटूंबातील आई वडीलांची इच्छा होती.पण सानिका ही भीषण ट्रक अपघातात मृत्युमुखी पडली अन् तिच्या आईवडीलांचा स्वप्नांचा पूर्णतः चुराडा झाला.

      तिची दुसरी मैत्रीण काजल आत्राम ही याच अपघातात गंभीर जखमी झाली.पोलिस विभागात नोकरी किंवा स्पर्धा परीक्षा देवून मोठे यश संपादन करावे या साठी त्यांनी ग्रामीण भागातून शहरी भागाकडे वाटचाल केली.त्या दृष्टीकोनातून त्या दोघींचे प्रयत्न सुरू होते.

        रुमवर व ग्रंथालयात जाऊन त्या अभ्यास करीत होत्या!पण शेवटी त्या यशाचा शिखर गाठू शकल्या नाहीत.

         दोन्ही मुली चंद्रपूर जिल्ह्यातील मुळ रहिवाशी असून त्यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधी मधून भरघोस मदत देवून त्यांचे पुनर्वसन करण्या यावे अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांना चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या मार्फतीने अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष जनार्धन गेडाम व कार्याध्यक्ष आनंद तिराणकर यांनी एका लेखी निवेदनातून केली आहे.