Home शैक्षणिक विद्यार्थ्यांचे स्वागत तथा पुस्तक-गणवेशांचे वाटप…

विद्यार्थ्यांचे स्वागत तथा पुस्तक-गणवेशांचे वाटप…

शुभम गजभिये 

  विशेष प्रतिनिधी 

    नगर परिषद,चिमूर प्रभाग क्रं १० जि.प.उच्च.प्राथ.शाळा,काग येथील विद्यार्थ्यांचा शाळेचा आजचा पहिला दिवस होता.शाळेच्या पहिल्या दिवशी शाळा व्यवस्थापन समिती,शिक्षक तसेच विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये इयत्ता १ ते ४ वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक व गणवेश देण्यात आले. 

      तसेच शाळेमध्ये ज्या नवीन विद्यार्थ्यांनी प्रवेश केला अशा सर्व विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत देखील करण्यात आले आणि पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रमासंदर्भात गिरडे सर यांनी मार्गदर्शन दिले.

    यावेळी गिरडे सर,शिक्षक जि.प.उच्च.प्रा.शाळा, काग) तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिपंकर मेश्राम,उपाध्यक्ष निशा नैताम,सदस्य संदीप मेश्राम,अंगणवाडी सेविका रेणुका भोपे,नमिता मेश्राम उपस्थित होते.