Home उपक्रम प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना अंतर्गत वारसांना दोन लाखांचा लाभ…

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना अंतर्गत वारसांना दोन लाखांचा लाभ…

अमान क़ुरैशी

जिल्हा प्रतिनिधि

 दखल न्यूज़ भारत

सिंदेवाही : तालुक्यातील अग्रगण्य असलेली विदर्भ कोकण ग्रामीण बँकचे वतीने प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना अंतर्गत वारसांना 2 लाखांचा आर्थिक निधी वाटप करण्यात आले.

      शासनाचे वतीने सुरू असलेले प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना अंतर्गत विदर्भ कोकण ग्रामीण बँकचे येथे वार्षिक 436 रुपये प्रीमियम भरणे सुरू होते. याच बँकेतील खातेदार असलेले मौजा कारगाटा येथील वामन नारायण सिडाम यांचा अचानक मृत्यू झाला त्यांचे पश्चात वारसान पत्नी ज्योती वामन सीडाम यांना 2 लाखाची आर्थिक मदत दिली.

      तसेच सावरगाटा येथील अल्का अरुण उपरीकार यांचा अचानक मृत्यू झाला असल्याने वारसान मुलगा अप्रित अरुण उपरीकार यांना 2 लाखाची आर्थिक मदत करण्यात आली. विदर्भ कोकण ग्रामीण बँकचे नियमित वार्षिक 436 रुपये प्रिमियम भरणा केल्याने प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना वारसांना 2 लाखांचा आर्थिक निधी वाटप बँक शाखा व्यवस्थापक विवेक सिडाम, सहाय्यक अनिकेत मेश्राम ऑफिस असिस्टट प्रणय मामीडवार यांचे उपस्थित बँकेचे कार्यालयात देण्यात आले.