युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
स्वामित्व योजनेअंतर्गत ग्रामिण भागातील 972 गावातील भुमापन पूर्ण झाले असून आहे.
अखीव पत्रिका ऑनलाईन उपलब्ध झाल्या असुन व्यवहार करताना अखीव पत्रिका शिवाय दस्त नोंदणी करु नये या प्रकारचे पत्र जिल्हा अधिक्षक भूमि अभिलेख अमरावती यांनी सह जिल्हा निबंधक वर्ग 1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी अमरावती यांना पाठविलेले असून त्यानुसार दर्यापूर येथे ग्रामिण भागातील दस्त नोंदणी करिता आखीव पत्रिकेची सक्ती करण्यात येत आहे.
परंतु दर्यापूर तालुक्यामध्ये आजपर्यंत कोणत्याही गावात आखीव पत्रिकेचे वाटप झालेले नाही किंवा त्यांना त्यांचे सिटी सर्वे नंबर प्रदान करण्यात आले नाही.
सदर राखीव पत्रिकेबाबत जनतेला माहीती नाही त्यामुळे तालुक्यातील प्रचंड व्यवहार थांबलेले आहे त्यामुळे शासनाचे सुद्धा नुकसान होत आहे व ग्रामिण जनतेला याचा आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे आम्ही शासनाची ही योजना लोकांपर्यंत पोहोचवली हे दाखवण्याकरिता व आपली पाठ थोपटून घेण्याकरिता सदर पत्र व्यवहार झालेला आहे.
सर्वे हा ग्रामपंचायत व भूमि अभिलेख यांच्या संयुक्तरित्या करण्यात यावा व त्यानंतर सदर जनतेकडून हरकती मागण्यात याव्या व ग्रामपंचायत तसेच भुमिअभिलेख यांचे रेकॉर्ड जुळवून अभियान घेऊन आखीव पत्रिकेचे वाटप करण्यात यावे व नंतरच सदरची सक्ती करण्यात यावी.
उगाच जनतेला त्रास देऊ नये व शासनाची सुद्धा फसवणूक करू नये त्वरित सदरची सक्ती मागे घ्यावी अन्यथा मनसे आपणा विरोधात आंदोलन करेल असा इशारा मनोज तायडे तालुकाध्यक्ष मनसे दर्यापूर यांनी निवेदनाद्वारे भूमी अभिलेख कार्यालयाला दिलेला आहे. सदर निवेदन देतेवेळी धामोडी नरसिंगपूर पराई,धामोडी येथील ग्रामस्थ उपस्थित होते.



