Home Maharashtra कुमार प्रथमेश चा विजेच्या धक्क्याने मृत्यू….

कुमार प्रथमेश चा विजेच्या धक्क्याने मृत्यू….

   उपक्षम रामटेके 

मुख्य कार्यकारी संपादक 

       प्रथमेश अतुल वानखेडे हा २० वर्षीय युवक आपल्या मित्रांसोबत चिमूर पासून ३ किलो मिटर अंतरावर असलेल्या बोरगाव शेत शिवारात आज देवदर्शनाला गेला होता.

        अचानक वातावरण बिघडल्याने मेघगर्जनेसह विजेच्या तांडवात पावसाला सुरुवात झाली.यातच हनुमान मंदीरात देवदर्शन करीत असताना जोरदार विज कडाडली आणि विजेच्या धक्क्याने कुमार प्रथमेश अतुल वानखेडे यांचा जागीच मृत्यू झाला.

        सदर घटना अंदाजे ४ वाजताची असल्याचे बोलले जात आहे.एका अनपेक्षित घटनेमुळे कुमार प्रथमेश अतुल वानखेडे गांधी वार्ड चिमूर यांचा मृत्यू झाल्याचे,चिमूर वाशियांना कळताच तेथील नागरीकांत हळहळ व्यक्त केली जात आहे.