Home Maharashtra काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात गडचिरोलीत ‘शेतकरी न्याय यात्रा…

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात गडचिरोलीत ‘शेतकरी न्याय यात्रा…

शुभम गजभिये 

विशेष प्रतिनिधी…

गडचिरोली :- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. हर्षवर्धन दादा सपकाळ हे दिनांक 12 जून 2025 रोजी गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांच्या नेतृत्वात ‘शेतकरी न्याय यात्रा’ काढण्यात येणार आहे. ही यात्रा इंदिरा गांधी चौक, गडचिरोली येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आयोजित करण्यात आली आहे. या यात्रेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या विविध ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडली जाणार आहे.

       या शेतकरी न्याय यात्रेत विधिमंडळ काँग्रेस पक्ष नेते आ.विजय भाऊ वड्डेटीवार, खासदार डॉ.नामदेव किरसान, अखिल भारतीय काँग्रेस सचिव कुणाल चौधरी,माजी खा. मारोतराव कोवासे, आ.रामदास मसराम,आ.अभिजीत भाऊ वंजारी, आ.सुधाकर अडबाले सर,निरीक्षक सचिन भाऊ नाईक, मनोहर पाटील पोरेटी यांच्यासह वरिष्ठ नेते व पदाधिकारी सहभागी होणार आहेत.

        या आंदोलनात जिल्ह्यातील शेतकरी बांधव, युवक, महिला, काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावेत, असे आवाहन गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केले आहे.