Home Social जनसुविधा निधी अंतर्गत गावविकास कामे मंजूर करण्याची केली चंद्रपूर जिल्हा परिषद मुख्य...

जनसुविधा निधी अंतर्गत गावविकास कामे मंजूर करण्याची केली चंद्रपूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे मागणी… — मौजा सावरी (बिडकर) येथील उपसरपंच निखिल डोईजळ यांनी दिले निवेदन..

शुभम गजभिये 

विशेष प्रतिनिधी 

      जनसुविधा निधी हा गावातील महत्त्वपूर्ण विकासासाठी असतो.हा निधी मौजा सावरी (बिडकर) येथील स्थानिक विकास कामांसाठी मंजूर करावा,अशी मागणी ग्रामपंचायत उपसरपंच निखिल डोईजळ यांनी लेखी पत्राद्वारे चंद्रपूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.

        मौजा सावरी (बिडकर) चिमूर तालुक्यात येत असून सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी बंदिस्त नालिचे बांधकाम मंजूर करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

       सांडपाण्यामुळे घाणीचे साम्राज्य गावातील काही भागात पसरले असून,सावरी (बिडकर) येथील नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम पाडणारी आहे.तसेच गावातील नागरिकांना सांडपाण्याच्या वाहत्या प्रवाहामुळे आवागमन करण्यासाठी गैरसोय होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.