ऋषी सहारे
संपादक
गडचिरोली :- तालुक्यातील पोटेगाव आरोग्य केंद्रा अंतर्गत जवळपास 12 ते 15 गावे येत असून तो आदिवासी बहुल भाग आहे. परिसर जंगलाने व्यापलेला आहे आणि त्यासोबत दिवसेंदिवस गावामध्ये नाल्या, संडास, गटर यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे दूषित पाणी व अन्य प्रदूषण प्रमाण सुद्धा वाढलेले आहे. याचा परिणाम म्हणजे नागरिकांना मलेरिया, टायफाईड, डेंगू सारखे आजार उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पोटेगाव परिसरातील नागरिकांच्या तक्रारीनुसार पोटेगाव अंतर्गत येणारी 12 ते 15 गावांमध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून फवारणी झालीच नाही याचा अर्थ अधिकाऱ्याला याचा विसर पडला आहे असा आरोप आजाद समाज पार्टीच्या वतीने करण्यात आला.
या संदर्भात तालुका आरोग्य अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना आजाद समाज पार्टीचे विधानसभा प्रभारी धनराज दामले यांचे नेतृत्वात निवेदन देऊन दोषी अधिकाऱ्यांची चौकशी करावी व परिसरात त्वरीत फवारणी करण्यासाठी कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली.
यावेळी जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, जिल्हा प्रभारी हंसराज उराडे, जिल्हा महासचिव पुरुषोत्तम रामटेके, कोषाध्यक्ष नागसेन खोब्रागडे, निवृत्त शिक्षक रमेश रामटेके, मीडिया प्रभारी सतीश दुर्गमवार इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.



