Home Social त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर यांना नालंदा बुद्ध विहार येथे अभिवादन…

त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर यांना नालंदा बुद्ध विहार येथे अभिवादन…

युवराज डोंगरे/खल्लार

          उपसंपादक

         त्यागमूर्ती रमाईबाई आंबेडकर यांच्या स्मृती दिनानिमित्त नालंदा बुद्ध विहार येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

          कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अध्ययन मंचाचे अध्यक्ष एकनाथ वासनिक होते तर प्रमुख पाहुणे म्हणून कविवर्य पद्माकर मंडवधरे धम्ममंचावर उपस्थित होते.

         याप्रसंगी मातोश्री रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून बुद्धवंदना घेऊन विनम्र आदरांजली अर्पण करण्यात आली. रमाईच्या जिवनावर आधारित कोमल मेश्राम यांनी गीत सादर केले तर पद्माकर मंडवधरे यांनी रमाईच्या जिवनावर आपली कविता सादर केली. अध्यक्षिय भाषणामध्ये एकनाथ वासनिक यांनी रमाई आंबेडकर यांच्या जिवनावर प्रकाश टाकला. 

        कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरज मंडे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन रवींकुमार मेश्राम यांनी केले. या कार्यक्रमाकरिता डॉ.बाबसाहेब आंबेडकर अध्ययन मंचे चे आजी माजी पदाधिकारी,सभासद, रमाई महीला मंडळ पदाधिकारी व सभासद आणि परिसरातील बहुसंख्य समाज बांधव उपस्थित होते.