Home देशविदेश वैचारिक तुलनात्मक लेखमाला केवळ भारतीय जनतेसाठीच…  — भाग = 013

वैचारिक तुलनात्मक लेखमाला केवळ भारतीय जनतेसाठीच…  — भाग = 013

        भाजपानेच भारताच्या आंतरराष्ट्रीय सार्वभौमत्वाचा हक्क गमावला……….

      या जगात इस्रायल एकमेव असा देश आहे की, भूप्रदेश आणि लोकसंख्येने कमी असतानाही…….

       शेजारी शत्रूराष्ट्रांचा घेराव असतानाही………

       केवळ विज्ञान, तंत्रज्ञानाच्या आधारे कृषीविकास साधून, इतर सर्वच क्षेत्रात लक्षणीय प्रगती इतर प्रगत युरोपियन राष्ट्राच्या तुलनेत करून जगाला थक्क करणारा हा देश म्हणजे इस्रायल….

      मोसाद नावाची इस्रायलची स्वतःच्या देश संरक्षणासाठी गुप्तहेर आणि जशास तसे उत्तर देणारी संस्था ही सुद्धा जगात क्रमांक एकचीच……!

        देशाला शत्रू राष्ट्राचे 90% क्षेपणास्त्र हाणून पाडण्याचे संरक्षणाचे कवच निर्माण करणारा एकमेव देश…….!

        केवळ 78 वर्षापूर्वी या देशाचा जन्म झाला……!

      ज्या देशातील जनतेचा ( यहूदिंचा ) कर्दनकाळ असलेला हिटलर…….

       ज्या 65 लाख यहूदिंना जिवंत मारणारा आईशमॅन (हिटलरच्या आदेशाने दुषकृत्य करणारा )…..

    दुसऱ्या महायुद्धात हिटलरने आत्महत्या केल्यावर युद्धसमाप्तीनंतर सोळा वर्षे भूमिगत राहून त्याला शोधून काढून 65 लाख यहूदिंच्या बळीचा बदला त्याला फासावर चढवून ज्याने घेतला…….

     तो यहूदिंचा देश म्हणजे…..

     इस्रायल….!

   एवढेच नव्हे तर……..

       1976 मध्ये फ्रांसचे विमान अपहरण अतिरेक्यानी केले. ज्यामध्ये 229 प्रवाशांपैकी 104 प्रवाशी एकट्या इस्रायलचेच होते. म्हणून हे विमानअपहरण झाले होते. हे विमानअपहरण 27 जून 1976 रोजी इराणच्या आणि इतर देशातील अतिरेक्यानी ते केले होते.

       फ्रांसमधून उडान झाल्याबरोबर काही मिनिटातच अपहरण करून अपहरणकर्त्यांनी ते विमान आफ्रिकन देशातील युगांडा देशात नेले. ज्या देशात हिटलरच्या नंतर प्रति हिटलर म्हणून जो कुपरिचित आहे, अशा मॅनइटर इदी अमीनच्या देशात घेऊन गेले.

        आणि तिथे इस्राएलच्या व्यतिरिक्त इतर प्रवाशांना वेगळे करून काहींना सोडून देण्यात आले. तर काहींना इतर रूममध्ये ठेऊन दिले.

      परंतु , हे विमान अपहरण मात्र केवळ इस्राएलच्या नागरिकांसाठीच केले होते. हे स्पष्ट झाले.

      आणि अपहरण कर्त्यांची मागणी ही होती की, इस्राएलच्या ताब्यात विविध जेलमध्ये बंदिस्त असलेल्या अतिरेकी कैद्याना आणि लाखो अमेरिकन डॉलर आमच्या ताब्यात द्यावे.

    या अपहरण प्रकरणात युगांडा देश सुद्धा सामील होता, हे त्यांच्या विमानाला संरक्षण देण्याच्या हेतूने स्पष्ट झाले.

     इस्रायलपासून चारहजार मैलावर असलेल्या हुकूमशहा असलेल्या युगांडा देशातून आपल्या नागरिकांना सोडवणे, तेही अपहरणकर्त्यांच्या मागण्या मान्य न करता…….

     म्हणजे कित्येक दिवसाच्या भुकेल्या सिंहाच्या जबड्यातून त्याच्या भक्षाला काढून घेण्यासारखेच होते.

         अशी यशस्वी कामगिरी इस्राएलच्या मोसादने पार पाडली, हुकूमशाह इदी अमीन आणि त्याच्या सैन्याच्या डोळ्यात धूळ फेकली (अर्थात हा थरारक इतिहास मोठा असल्यामुळे इथे मांडता येणार नाही. पुढे कधीतरी स्वतंत्र पोस्ट टाकेन )…….!

       असा हा मूर्ती लहान पण कीर्ती महान असलेला इस्राएल हा देश त्याच्या जन्मापासूनच ते आजपर्यंत आंतरराष्ट्रीयस्तरावर आपल्या देशाचे सार्वभौमत्वाचा मूलभूत अधिकाराचे संरक्षण करण्यासाठी कोणत्याही बलाढ्य राष्ट्राचे शत्रूत्व पत्करन्यास नेहमी तत्पर असतो.

       आजही हमास आणि इराण विरुद्ध त्यांची लढाई चालूच आहे. याचा अर्थ हा नाही की, युद्ध ही योग्य बाब आहे. परंतु , आपल्या देशाचे, जनतेचे सर्वांगीण संरक्षण करणे, त्यासाठी कोणतीही तडजोड न स्वीकारता ती पार पाडणे, तुम्हीही जगा आणि आम्हालाही जगू द्या ही लोकशाही संकल्पना जिवंत ठेवण्यासाठीचा हा अपघाताने झालेला हा लढा असतो. हाच तर सार्वभौमत्वाचा मूलभूत अधिकार आहे. त्याचे संरक्षण करणे हे प्रत्येक राष्ट्राचा अधिकार आहे.

      याच अधिकाराचे संरक्षण आम्ही भारताने केले नाही. हे दोन ऐतिहासिक घटनेवरून लक्षात येते.

     जेंव्हा 30 डिसेंबर 1999 ला आमचे एअरइंडियाचे विमानअपहरण मौलाना मसुद अजहरला आणि इतर 40 कैद्याना तसेच लाखो अमेरिकन डॉलर आमच्या ताब्यात द्या. म्हणून अपहरण झाले होते.अफगाणिस्तान मधील कंदहार विमानतळावर शेवटी ही डील भारताने स्वीकारली त्यात मौलाना मसुद अजहर आणि इतर दोन दहशतवाद्याना तसेच लाखो अमेरिकन डॉलर देऊन आम्ही आमच्या 148 नागरिकांचे प्राण वाचवले………!

      परंतु , आम्ही इस्राएलप्रमाणे मुत्सदेगिरीचा आणि सैन्यबळाचा वापर करून दहशतवादी आणि डॉलरचे हस्तांतर न करता सुद्धा इस्राएलचा आदर्श घेऊन करू शकलो असतो…….!!!

        परंतु , या प्रकरणात तत्कालीन वाजपेयी सरकार कुचकामी ठरले….!

आमची गुप्तहेर संस्था कुचकामी ठरल्या…….!

   नंतर याच मौलाना मसुद अजहरने संसदेवर 2000 मध्येच अतिरेकी हल्ला घडवून आणला…….!

     आणि याच मौलाना मसुद अजहरने जैश -ए -मोहम्मद च्या अतिरेकी संघटनेतून अतिरेकी प्रशिक्षण केंद्र चालवून अनेक दहशतवादी हल्ले भारतात आजपर्यंत घडवून आणले…….!

    याच दहशवादी मौलाना मसुद अजहरने 4 अतिरिक्यांच्या माध्यमातून काश्मीरच्या पहलगाममध्ये आमच्या 27 पर्यटकांना गोळ्या घालून ठार मारले……..!

     परिणामी सिंदूर ऑपरेशन आम्ही केले. त्यातही प्रमुख मौलाना मसुद अजहर सहित मुख्य अतिरेकी यातून जिवंत सुटले……!

        आणि पुन्हा एकदा अतिरेक्याना कायमचे संपविण्याची चालून आलेली संधी डोनाल्ड ट्रम्पच्या तोंड खूपसण्यामुळे नव्हे तर मोदीने ती संधी मुद्दाम उपलब्ध करून दिल्यामुळे आम्ही गमावून बसलो……!

        परिणामी भाजपानेच दोन वेळेस 1999 मध्ये आणि आता भारताच्या सार्वभौमत्वाचा आंतरराष्ट्रीय मूलभूत अधिकार गमावला……!!!!

     जागृतीचा कृतिशील लेखक

    अनंत केरबाजी भवरे 

संविधान विश्लेषक, रेणापूरकर, औरंगाबाद, 7875452689