Home Maharashtra शासनमान्य पत्रकार संघाचे दोन पत्रकार उतरणार नगरपरिषद रिंगणात…  — नगरपरिषदेत ठेवणार...

शासनमान्य पत्रकार संघाचे दोन पत्रकार उतरणार नगरपरिषद रिंगणात…  — नगरपरिषदेत ठेवणार पारदर्शक व्यवहार, प्रत्येक माहिती “व्हॉट्सॲप” वर दिसेल जनतेला…

 ऋग्वेद येवले

   उपसंपादक

दखल न्यूज भारत 

साकोली : होय, हे खरे आहे. जर पत्रकारच नगरपरिषदेत पोहचणार तर, भ्रष्टाचार काय तर साधे गैरव्यवहाराच्या एकुण एक बातम्या सोशल मिडीया व वृत्तपत्रांतून झळकणार. आणि सर्व कारभार जनतेसमोरच असणार. सध्या साकोली सेंदूरवाफा नगरपरिषदेत काही दोन प्रभागात दोन निर्भिड व शासनमान्य पत्रकार संघातील पत्रकारांची जोरदार चर्चा सुरू आहे. की आता पत्रकारांचीच या अविकास करून ठेवलेल्या साकोली नगरपरिषदेला नितांत गरज आहे. 

            सन २०१७ ला साकोली नगरपरिषद अस्तित्वात आली. पण नगरपरिषदेतील वरीष्ठ काहींनी एवढा करोडोंच्या संख्येने आर्थिक निधी प्राप्त होऊनही शहरात साधे शौचालय काय तर रोडवर एक मुत्रीघर बांधू शकले नाही. जनतेला यांची पुरेपूर व निरंतर माहिती स्थानिक साकोली सोशल मिडीयातून तीन वर्षांपासून होत आहे. म्हणूनच यापुढे आता भ्रष्टाचारावर, गैरव्यवहारावर, शासकीय जनतेच्या पैशाची अफरातफरी करणा-यांवर ताबडतोब आळा बसावा व जनतेसमोर पारदर्शकता ठेवून विकासकामे कशी करावी. आणि आलेल्या विकासनिधींचा एकुण एक हिशोब हा सोशल मिडीयातून व वृत्तसेवा माध्यमातून सर्व काही मतदार जनतेसमोर आणण्यासाठी आता दोन्ही महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष व साकोली पत्रकार डी. जी. रंगारी आणि प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष व निर्भिड साकोली मिडीया एडीटर आशिष चेडगे हे आता भ्रष्टाचारावर बिमोड करण्यासाठी नगरपरिषदेच्या रिंगणात उतरले आहेत.

          तीन दिवसांपूर्वी एका सोशल मीडियावर एका प्रतिष्ठीत व्यक्तीने प्रतिक्रिया दिली होती की, या नगरपरिषदेत असे निर्भिड पत्रकारांची फार आवश्यकता आहे. आणि येथे होणारा प्रचंड भ्रष्टाचार, गैरव्यवहार, बोगस टेंडर मॅनेज, गोरगरीब कामगारांसोबत अन्याय, बोगस कंत्राटी, बोगस बिले अश्या बेकायदेशीर व अफरातफरी प्रकरणांवर या निर्भिड पत्रकारांमुळे निश्चितच आळा बसेल व सर्व सत्य स्थिती सोशल मिडीयातून जनतेसमोर असेल.

      अशी चर्चा साकोली शहरात सुरू आहे. एकीकडे सोशल मिडीयातून जबरदस्त व बेधडकपणे लिखाण करून मागील गैरव्यवहाराचा दणका देणारे २५ वर्षीय अनुभवी पत्रकार आशिष चेडगे व दूसरीकडे उच्च शिक्षित आणि शिक्षक असणारे एशियन न्यूज संपादक डी. जी. रंगारी यांनी नगरपरिषद साकोलीच्या रिंगणात उडी घेतल्याने मात्र गैरव्यवहार व आतापासूनच “लुटमार” करण्यासाठी फिल्डींग लावणा-यांचे या दोन्ही स्थानिक व मुळ निवासी पत्रकार उमेदवारांमुळे चांगलेच धाबे दणाणनार आहेत हे मात्र नक्की. आणि काही शहरातील शिक्षित जागरूक जनतेने या दोन्ही पत्रकारांना आतापासूनच हिरवी झंडी दाखवली असून तुमची या भ्रष्टाचाराचे पोखरलेल्या साकोली नगरपरिषदेला नितांत गरज असल्याचे मत जनतेने व्यक्त केले आहे.