भूतलावरील स्वर्गाचे सुख मिळवण्यासाठी गेलेल्या 26 भारतीय पर्यटकांची पाकिस्तानी दहशत वाद्यांनी हत्या केली.आपल्या महिलांचे कपाळाचे कुंकू पुसले.त्यांना विधवा बनविले.या दुष्ट कृत्याचा बदला घेण्याचा निर्णय मोदींनी घेतला.सर्व पक्षांनी जनतेनी पण त्यांना पाठिंबा दिला.म्हणून पंतप्रधानाने ऑपरेशन सिंदूर केले.याचे नेतृत्व एका एस. सी.आणि मुस्लिम सैन्याधिकाऱ्यांनी केले.यामुळे आपल्या सैन्याकडील अद्यावत शस्त्रास्त्र आणि सैनिकांची बहादुरीचे दर्शन घडले.आपली यशस्वितेकडे वाटचाल पण चाललेली होती.स्वातंत्र्यापासूनचा प्रलंबित पाकव्याप्त ( pok ) काश्मीर प्रश्न सोडविण्याची संधी होतीच.तसेच आर.एस.एस. आणि भाजपचे अखंड भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी म्हणजेच पाकिस्तान जिंकून घेण्याची संधी पण आपल्या सैन्याने दिली होती.आपल्या सैनिकांनी आपले प्राण दिले,प्राणांची पर्वा केली नाही,सर्व अधिकार सैन्यास दिल्यामुळे आपले तिन्हीही सैन्यदल जीवाची पर्वा न करता लढत होते.पाकिस्तान जिंकून एकदाचा मुस्लिम हिंदूंचा झगडा कायम मिटून टाकण्याचा त्यांचा विचार होता.कारण हिंदू मुस्लिम,हिंदुस्थान पाकिस्तान करीत सीमेवर कायम संरक्षणाचा खर्च करीत राहण्यापेक्षा आणि लढाईची टांगती तलवार डोक्यावर कायम ठेवण्यापेक्षा पाकिस्तानच ताब्यात घेणे गरजेचे होते.यामुळे जगापुढील असलेली समस्या म्हणजे दहशतवाद ,तो पण कायम संपला असता,एव्हढुमोठी संधी चालून आलेली असताना,सैन्यास संपूर्ण अधिकार देऊनही त्यांनाच निर्णय घ्यायचे स्वातंत्र्य द्यायला हवे होते.त्याऐवजी ट्रम्पचे ऐकून आपण सैन्याला दिलेले युद्धाचे स्वातंत्र्य हिरावून घेतले,यामुळे सैनिकांचे मनोधैर्य खचणार नाही का ? यापुढे पंतप्रधानांवर विश्वास तरी ठेवतील का ? असे प्रश्न माझ्या सारख्या सामान्य जागृत नागरिकास पडतो आहे.देशातील जनतेचा आणि सैन्याचा हा भयंकर विश्वासघातच म्हणायला हवे. स्वातंत्र्या नंतर शेजारी देशाशी अनेक लढाया झाल्या,पण आज पर्यंतच्या कोणत्याही प्रधानमंत्र्याने दुसऱ्याचे ऐकून माघार घेतली नव्हती.देशातील जनतेचा आणि सैन्याचा विश्वास गमावला नव्हता तो मोदींनी गमावला.त्यांनी देशाची आणि सैनिकांची माफी मागून राजीनामा दिला पाहिजे,तसेच 26 भारतीय पर्यटकांचे संरक्षण करण्यात निकामी म्हणून गृहमंत्री अमित शहा ने पण राजीनामा दिला पाहिजे ,नैतिकता जपण्यासाठी.
ज्या संघाने आणि भाजपने नेतृत्वावर विश्वास ठेवला,अखंड भारताचे स्वप्न पूर्ण करण्याची अपेक्षा केली,ती संधी आली तरी धुडकावून लावल्याने अपेक्षा भंग झाला,म्हणून त्यांनी या दोघांना निलंबित करण्या ऐवजी उलट त्यांची तारीफ करताहेत.यामुळे यांना दहशतवाद संपवायचा नाही,अखंडभरात करायचा नाही,हे सिद्ध होते.आणि निवडणुका जिंकण्याच्या यांच्या या केवळ पोकळ घोषणा आहेत,असेच म्हणावे लागेल.
शेवटी आपल्या प्रधानमंत्र्यास काश्मीर प्रश्ना ऐवजी,अखंड भारता ऐवजी ” व्यापार” च महत्वाचा वाटला.याचा अर्थ गुजराथी माणूस हा देशा पेक्षा व्यापारास महत्व देतो.त्यास पैसा प्यार आहे,राष्ट्र प्यार नाही.पैश्यासाठी देश पण विकायला किंवा द्यायला मागे पुढे पाहणार नाही.याचे कारण व्यापारी प्रवृती ही आहे.खरे तर सत्तेवर आणि लढाई साठी क्षत्रिय प्रवृत्तीचाच माणूस हवा.शूरवीर पराक्रमी माणूस ,आणि राष्ट्राभिमान असलेला माणूस हवा. लोकशाहीवादी अखंडप्राय देश चालविणे,आणि लढाई करणे हे येरा गबाळे कचखाऊ भित्र्या नेतृत्वाचे काम नव्हे.तेथे पाहिजे जातीचे.लढवय्ये.


