ऋषी सहारे
संपादक
गडचिरोली विश्रामगृहात आगामी निवडणुका, सदस्यता नोंदणी अभियान विषयावर आजाद समाज पक्षाची बैठक आज संपन्न झाली. बैठकीला अध्यक्ष स्थानी महाराष्ट्र प्रभारी भाई रुपेश बागेश्वर, प्रदेश महासचिव डॉ. जे. बी. रामटेके, प्रदेश सचिव दिगांबर पळटनकर व नव नियुक्त विदर्भ प्रदेश अध्यक्ष नितीन नागदेवते उपस्थित होते.
आगामी निवडणुकांची तयारी व नियोजनासाठी सदर बैठकीचे आयोजन केले असून आजाद समाज पक्षाने अतिशय कमी दिवसात जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांच्या नेतृत्वात व सक्रिय पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने पक्षाचा मोठा प्रभाव गडचिरोलीच्या राजकारणात निर्माण केला असून भाई चंद्रशेखर आजाद यांची विशेष लक्ष गडचिरोली वर आहे असे प्रतिपादन प्रभारी रुपेश बागेश्वर यांनी केले असून त्या काही विशिष्ट समीकरण बनवून जिल्ह्यात निवडणुका लढण्याचे आदेश सुद्धा दिले.
उमेदवार निवड समिती यावेळी गठीत करण्यात आली…
समितीच्या अध्यक्ष पदी प्रदेश महासचिव डॉ.जे बी. रामटेके, सदस्य म्हणून विदर्भ अध्यक्ष नितीन नागदेवते, प्रदेश सचिव धर्मानंद मेश्राम, प्रभारी हंसराज उराडे, जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, उपाध्यक्ष खुशाल मरसकोल्हे यांची समितीवर निवड करण्यात आली.
जिल्हा प्रभारी विनोद मडावी काही दिवस fellowship साठी देशभरात दौऱ्यावर असल्याने त्यांची जागा भरून काढण्यासाठी जिल्हा उपाध्यक्ष खुशाल मरसकोल्हे यांना युवा आदिवासी चेहरा म्हणून गडचिरोली विधानसभा प्रभारी पदाची जबाबदारी देण्यात आली.
तसेच हंसराज उराडे यांचा सक्रिय काम पाहता त्यांना जिल्हा प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली.
यावेळी जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपापल्या ग्रामपंचायत मध्ये निवडणुकीची तयारी करावी व पक्षात काम करणाऱ्या प्रत्येक पदाधिकाऱ्याने स्वतः निवडणुका लढण्यासाठी सज्ज राहावे असे आवाहन केले. राजकारणात निवडणुका जिंकणे हाच अंतिम उद्देश असून केवळ जयंत्या-उत्सव साजरे करण्यासाठी पक्षात काम करू नये, फुले आंबेडकरी राजकारणात केवळ सभा सोहळे, जयंत्या – उत्सव साजरे करण्याचा ट्रेंड असून त्यामुळे निवडणुका जिंकता येत नाही अशी ही कानटोचणी कार्यकर्त्यांची केली.
बैठकीला जिल्हा महासचिव पुरुषोत्तम रामटेके, जिल्हा प्रवक्ते प्रितेश अंबादे, कोषाध्यक्ष नागसेन खोब्रागडे, जिल्हा सचिव प्रकाश बन्सोड, युवा आघाडी अध्यक्ष विवेक खोब्रागडे, मीडिया प्रभारी सतीश दुर्गवार, चामोर्शी तालुकाध्यक्ष रघुनाथ वासेकर, कुरखेडा अध्यक्ष सावन चिकराम, गडचिरोली शहराध्यक्ष आशिष गेडाम, महिला सचिव शोभा खोब्रागडे, गडचिरोली महिला अध्यक्ष सविता बांबोळे, हरीश वाकडे, प्रतीक खोब्रागडे, भोजराज बारसागडे आदी उपस्थित होते.



