युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
मांजरी म्हसला केंद्राची शिक्षण परिषद तथा कमलाकर कदम यांचा सेवापूर्ती सोहळा मोखड येथे नुकताच पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कविताताई दुर्गे अध्यक्ष शा.व्य.स. या तर विशेष अतिथी म्हणून कल्पना वानखेडे, विलास वाबरे, सुरज मंडे, प्रमुख अतिथी म्हणून तिलोत्तमाताई घोडेस्वार सरपंच मोखड, डॉ. प्रफुल्ल कापडे उपसरपंच, सुनिल शिरभाते सामाजिक कार्यकर्ते, प्रियंका कापडे उपाध्यक्ष शा.व्य.स, सचिन कापडे , किरण अजमिरे, अशोक टाके, उत्तम डाखोरे, प्रियंका अजमिरे, योगिता परतेकी, वृषाली सोनोने, आश्विनी सोनोने, अमित हांडे, रहेमतखा पठाण, माया गावंडे, प्रविण पवार, नगमा शाहिन शाह, प्रियंका मोरे, सारीका मोरे, आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी राजेंद्र देशमुख, कल्पनाताई वानखडे, सुनिल शिरभाते, आश्विनी सोनोने, विलास बाबरे, मधुसुदन काळमेघ यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या प्रसंगी सत्कारमूर्ती कमलाकर कदम यांचे सेवापुर्ती समारंभ निमित्त विविध संस्था व वैयक्तिक रित्या त्यांना भेटवस्तू, बुके व शाल देवून यथोचित सन्मानीत करण्यात आले. त्यामधे प्रामुख्याने मांजरी म्हसला केंद्र, जि.प.शाळा मोखड, शाळा व्यवस्थापन समिती मोखड, ग्रामपंचायत मोखड यांचे तर्फे सन्मानित करण्यात आले. सचिन कापडे, अशोक टाके , तृप्ती मोरे, किशोर कापडे, अमोल जाधव, महेंद्र इंगोले, वैशाली इंगोले, राहुल आकोडे, सविता कापडे, महावीर ढेंबरे आणि शालेय विद्यार्थ्यांनी सुद्धा सरांचा सत्कार केला.
मोखड शाळेच्या वतीने, गटशिक्षणाधिकारी कल्पना ठाकरे, नव्याने रुजू झालेले विलास बाबरे विस्तार अधिकारी शिक्षण आणि मधुसूदन काळमेघ उच्च श्रेणी मुख्याध्यापक याचा सत्कार करण्यात आला.
मांजरी म्हसला केंद्रातून बदली झालेल्या शिक्षकांना उत्कृष्ट शैक्षणीक कार्य केल्याबद्दल स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देवून सन्मानित करण्यात आले त्यामधे प्रामुख्याने उज्वला भडांगे, उमेश ठाकरे, सतिश डोंगरे, ज्योती देशमुख, विजय चव्हाण, राखी सरोदे आणि अर्चना बैतुले, यांचा समावेश होता.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कमलाकर कदम, राजेंद्र देशमुख, जितेंद्र यावले, कु.स्वाती टारपे, धनाजी चव्हाण, वैशाली दहिकर, अजय गावंडे, आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला केंद्रातील सर्व शिक्षक उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरज मंडे यांनी संचालन जितेंद्र यावले, तर आभार प्रदर्शन अनिल देशमुख यांनी केले



