Home Social अचलपूरचे आमदार प्रविण तायडे यांचे खल्लार सर्कल मध्ये स्वागत व सत्कार…

अचलपूरचे आमदार प्रविण तायडे यांचे खल्लार सर्कल मध्ये स्वागत व सत्कार…

युवराज डोंगरे/खल्लार

        उपसंपादक 

        दि.15 मे रोजी अचलपूर मतदार संघाचे आमदार प्रविण तायडे हे दौऱ्यावर असताना त्यांचे खल्लार सर्कल मध्ये आमदार झाल्यावर पहिल्यादा आगमन झाले असता त्यांचे मोठ्या उत्साहात खल्लार सर्कल व मित्र परिवाराच्या वतीने खल्लार फाट्यावर मोठया उत्साहात शाल, श्रीफळ व पुच्छगुच्छ देऊन सत्कार व स्वागत करण्यात आले. 

        शिंगणापूर ते अंजनगाव या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी पोहचण्यासाठी हा महत्वाचा रस्ता आहे. या रस्त्याच्या कामासाठी आपण पाठपुरावा करावा असे निवेदनही यावेळी आमदार प्रविण तायडे यांना देण्यात आले.

       भारतीय जनता पार्टी,युवा स्वाभिमान पार्टी व शिवसेना पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते अतुल गोळेसह सुभाष हरणे,संदीप मालठाणे, गजानन शिंगणे, राजू मोपारी,संदीप सावरकर, गोपाल वसु उमेश गादे प्रविण मोपारी, अमेय मोपारी अंकुश रहाटे, गोपाल यादव, शरद कालंके सोपान घुरडे ,मुरलीधर ठाकरे, नितेश घुरडे, तेजस मोपारी,भूषण बोरखडे, शुभम ताजने, धनराज सदार, उमेश बोंडसे,निवृती घुरडे मंगेश पाचखंडे सत्यजित वर्धे सह कार्यकर्ते उपस्थित होते.