Home Maharashtra उन्हाळी हंगाम २०२४-२०२५ अंतर्गत धान खरेदी केंद्र तात्काळ सुरु करण्याबाबत शेतकऱ्यांची मागणी…....

उन्हाळी हंगाम २०२४-२०२५ अंतर्गत धान खरेदी केंद्र तात्काळ सुरु करण्याबाबत शेतकऱ्यांची मागणी…. — पुनर्वसन व वित्त,विधी राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्हा सह पालकमंत्री ना.आशिष जैयस्वाल यांना दिले निवेदन…

राजेंद्र रामटेके 

विशेष प्रतिनिधी 

         मौजा :- देलनवाडी, मानापुर, मांगदा, कोसरी, तुलतुली, चव्हेला, नागरवाही, शिवणी, मोहझरी, सुकाळा या परिसरातील शेतकऱ्यांकडे पाण्याचे साधन असल्याने मोठ्या प्रमाणात उन्हाळी धान पिकाची लागवड केली जाते.

        उन्हाळी धान पिक निघाले असून कापणी व मळणी होवून शेतकऱ्यांनी शेतात ढगी मारून धान ठेवले आहेत.

          यामुळे धान खरेदी केंद्र सुरु होण्याकरिता शेतकरी वाट पाहत आहेत.परंतु अजून पर्यंत सबंधित संस्थेनी धान खरेदी बाबत ऑनलाईन नोंदणी सुरु केलेली नाही.ऑनलाईन नोंदणी करिता कागदपत्रे सबंधित संस्थेकडे शेतकरी घेऊन गेले असता संस्थेवाल्यांनी आम्ही ऑनलाईन नोंदणी करणार नाही,कारण खरेदी केंद्रावर खरीप हंगामाचे माल पडून आहे,जो पर्यंत आदिवासी विकास महामंडळ व शासन हा माल उचल करत नाही व महामंडळाकडून संस्थाच्या समस्या सुटत नाही तो पर्यंत केंद्र सुरु होणार नाही असे संस्थेवाल्यानी मौखिक कळविले असल्याचे शेतकऱ्यांनी निवेदनात नमूद केले आहे.

         परंतु धान खरेदी केंद्र सुरु न झाल्यास शेतकऱ्यांना कौडीमाल भावात धान माल विकावे लागेल,सध्या स्थित १७ ते १८ रूपये किलो प्रमाणे खाजगी व्यापाऱ्यांनी धान माल घेणे सुरु आहे.या मध्ये जवळपास क्विंटल मागे ५००/- ते ६००/- रूपयाचे शेतकऱ्यांचे नुसकान होत आहे,असे सुध्दा शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

      त्यातच अधूनमधून अवकाळी पाउस सुरु आहे.अवकाळी पावसामुळे सुध्दा शेतकऱ्यांचे आर्थिक नुसकान झालेले आहे.

       त्यामुळे शासकीय धान खरेदी केंद्र सुरु होणे आवश्यक आहे,अन्यथा शेतकऱ्यांची व्यापारी वर्गाकडून मोठ्या प्रमाणात पिळवणूक करून शेतकऱ्याला याचा आर्थिक फटका बसणार आहे व शेतकऱ्यांची पिळवणूक होणार आहे अशी शेतकऱ्याची गंभीर परिस्थिती आहे.

           तसेच येत्या ८ ते १० दिवसात पावसाळ्याला सुरवात होत असून अचानक पावसाळाला सुरवात झाल्यास शेतात ढगी मारून असलेला शेतकऱ्यांचा धान माल पुर्णतः खराब होण्याची शक्यता आहे.

        अचानक पाउस आल्यास शेतातून धान माल काढणे शक्य नाही व पावसाचे पाणी धान मालावर गेल्यास खराब होण्याची शक्यता आहे.

         खरीप हंगामाला जुन महिन्याला सुरुवात होत असल्याने खत,बियाणे घेणे व शेतीला लागणारे साहित्य घेणे आवश्यक आहे.

        त्वरित धान खरेदी केंद्र सुरु झाले नाही तर खाजगी व्यापाराला पडक्या कवळी मोल भावाने शेतकऱ्याला धान माल विकावे लागेल व शासकीय हमीभाव धान खरेदी योजने पासून वंचित राहावे लागेल,अशाप्रकारच्या दुःखद् भावना राज्यमंत्री ना.आशिष जयस्वाल यांच्या पर्यंत शेतकऱ्यांनी पोहचविल्या आहेत.

      उन्हाळी धान उत्पादक शेतकऱ्यांना शासकीय धान खरेदी योजनेचा लाभ मिळावा या करिता शेतकऱ्यांची अडचण लक्ष्यात घेवून त्वरित खरेदी केंद्र सुरु करावे अशी मागणी राज्य मंत्री आशिष जयस्वाल यांच्याकडे शेतकऱ्यांनी केली आहे.

      धान खरेदी केंद्र तात्काळ सुरु न केल्यास सबंधित कार्यालयावर व आपल्या कार्यालयावर शेतकऱ्यांच्या वतीने आदोलन करून धडक मोर्चा काढण्यात येईल असेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

   राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांना निवेदन देताना खालील शेतकरी हजर होते.

     सर्वश्री श्री.तुळशीदास काशिकर माजी उपसभापती ,श्री.लेनगुरे,ऋषीजी वाघाडे नीलकंठ वाटगुरे,वामन सोनटक्के,केशव कोटरंगे,भानुदास कोटरंगे,रामहरी चौधरी,हरिदास हलामी,रामभाऊ हस्तक,प्रशांत ढोक,हरबाजी घोडमारे,दुमाकांत घोडमारे,आबाजी कन्नाके,अर्जुन लंजे,देवराव मडावी,अंकालू मडावी,विशाल मशाखेत्री,भजनराव मडकाम,मोतीराम कोल्हे,केशरी मडावी,जीवन खुरसाम,भाईचंद गुरनुले,शामराव घोडमारे,जीवन दडमल,भास्कर घोडमारे,उमाजी निकुरे,रंजित हिचामी,तुकाराम वैरकार,शालीकराम मोहुर्ले,सेवदास भानारकर,प्रभुलाल बिसेन,सोमेश्वर मेश्राम,जगदीश कुमरे,ईश्वर मडावी,रत्नाकर धाईत,देविदास कुमरे,वामन लाखनकार,जितेंद्र नाकाडे,बापुराया वाटगुरे,किशोर मस्के,भामराज हर्षे,हरिदास निकुरे,नानाजी लाखनकार,धनिराम कुमरे,जगदीश चौधरी,देवेंद्र मोरघडे,गणेश चौधरी,हरिदास कोटरंगे,भजनराव मडावी,जनार्धन साळवे,आबाजी चौधरी,मनोहर जेंगठे,राकेश पिल्लारे,अविनाश कन्नाके,धर्मा हिचामी,पुंडलिक आगरे,सुरेश नाकाडे, मनीष उंदिरवाडे,आदी शेतकरी…