Home Social धम्मांजली महिला मंडळ चिमूर द्वारा इंदिरा नगर येथे तथागत भगवान गौतम बुद्धांची...

धम्मांजली महिला मंडळ चिमूर द्वारा इंदिरा नगर येथे तथागत भगवान गौतम बुद्धांची जयंती उत्साहात साजरी…

उपक्षम रामटेके/शुभम गजभिये 

चिमूर :- इंदिरा नगर चिमूर धम्मंजली महिला मंडळाच्या वतीने तथागत भगवान गौतम बुद्धांच्या जयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

       तथागत भगवान गौतम बुद्धांच्या जयंतीचा,(बुद्ध पौर्णिमाचा) कार्यक्रम डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती विचार मंच येथे आयोजित करण्यात आला होता‌.

        जयंती उत्सव कार्यक्रम निमित्ताने आलूभात व खिरदान धम्मांजली महिला मंडळाद्वारे करण्यात आले. 

     

       तथागत भगवान गौतम बुद्धांच्या जयंती कार्यक्रमा निमित्त प्रवक्त्यानां बोलवण्यात आले होते.त्यांनी उपस्थित बौद्ध उपासक-उपासिकांना उत्तम मार्गदर्शन केले.

        कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेल्या प्रमुख पाहुण्यांचं स्वागत,स्वागत गिताने करण्यात आले.ऍडव्होकेट संजीवनी सातारडे,हरी मेश्राम,शिक्षिका-उपासिका कल्पना गायकवाडताई,समाजसेवक किशोर अंबादे,श्री.विलास इंदूरकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

       या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री.संतोष भैसारे हे होते.

         तक्षशिला बौद्ध विहारचे सदस्यागन व शहरातील सर्व बौद्ध उपासक व उपासिका यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.

         या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ.रसिका अरुण लोखंडे यांनी केले.