शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी…
चिमूर : – चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यातील मौजा मुरपार येथील राहिवासी सुंदराबाई रातीराम दोडके वय ६४ वर्षे यांचेवर सकाळी ७ वाजताच्या सुमारास संरक्षित वन क्रमांक. ३४८ मध्ये तेंदूपत्ते तोडत असतांना जंगली डुक्कराने अचानक हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली असून गावकऱ्यांनी तात्काळ प्रथमोपचारासाठी चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबतची माहिती वनविभागाला मिळताच उपचारादरम्यान आर. एफ.ओ. के.बी देऊळकर यांच्या मार्गदर्शनात श्री.यू.बी लोखंडे क्षेत्र सहाय्य्क मुरपार,आर.बी. केदार वनरक्षक मुरपार यांनी घटनास्थळ पंचनामा करीत जखमी महेलिची भेट घेतली.
पुढील तपास वनविभागाचे संबंधित कर्मचारी करीत आहेत.



