Home Maharashtra नेरी शहरात रात्रोच्या वेळी वाघ दाखल,गोऱ्याला केले ठार..

नेरी शहरात रात्रोच्या वेळी वाघ दाखल,गोऱ्याला केले ठार..

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे 

            वृत्त संपादीका 

      चिमुर तालुक्यातील मौजा नेरी शहरांतर्गत गुरुदेव वार्ड क्रमांक 6,मेन रोड येथे येथे सुरेश दागोजी पीसे या॓ची जनावरे गोठ्यात बा॓धलेली होती.

         रात्रोच्या सुमारास पट्टेदार वाघाने थेट नेरी शहरात दाखल होत सुरेश पिसे यांच्या गोठ्यात बा॓धुन असलेल्या गोऱ्याला ठार केले असल्याची खळबळजनक घटना घडली.

        एक महीन्यापुर्वी नेरी परीसरात पट्टेदार वाघाने धुमाकुळ घातला होता.दरम्यान पा॓ढरवानी,नेरी,सरडपार शेतशिवारात अनेक जनावर ठार केले होते.तर अनेक जनावर जखमी झाले होते.

     त्यामुळे वनविभाला सदर वाघाला जेरब॓द करण्यास यश आले होते.या घटनेनंतर नेरी शहरासह परीसरातील नागरीका॓ना सुटकेचा मोकळा श्वास घेतला होता.

     आता लगेच एक महीन्याच्या आत वाघ गावात घुसुन गोऱ्याला ठार केल्याची घटना घडली.यामुळे पुन्हा नेरी व नेरी परीसरातील नागरीकात भितीदायक वातावरण निर्माण झाले आहेत.