शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी..
चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यातील मौजा नेरी ते मौजा उसेगांव रोडचे काम मागील एक वर्षापासून बंद आहे,रोड पूर्ण उकडुन गेलेला आहे,रोडला अनेक ठिकाणी गिठ्ठी निघालेली आहे.
यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना तसेच लोकांना जाण्यासाठी खुप त्रास होत आहे.दवाखान्यात रूग्णाला नेतांना सुध्दा अडचण निर्माण होत आहे,प्रवास करणे कठीण झाले आहे.
मौजा उसेगाव येथील नागरिकांना उसेगाव ते नेरी,नेरी ते उसेगाव असे आवागमन करताना सर्व सामान्य जनतेचे खुप हाल होत आहेत.
संबधित अधिकाऱ्यांनी व आमदार असलेल्या लोकप्रतिनिधींनी मौजा नेरी ते मौजा उसेगाव या रस्त्याच्या कामाला प्राधान्याने सुरुवात करण्यासाठी लक्ष केंद्रित करावे अशी आर्त हाक मौजा उसेगाव वासियांची आहे.



