Home Maharashtra निरा नरसिंहपुर येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा 134 वा जयंती उत्सव करण्यात...

निरा नरसिंहपुर येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा 134 वा जयंती उत्सव करण्यात आला साजरा.

  बाळासाहेब सुतार

निरा नरसिंहपुर प्रतिनिधी 

      निरा नरसिंहपुर तालुका इंदापूर येथे सालाबाद प्रमाणे यावर्षी सुध्दा भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. 

     या कार्यक्रमा प्रसंगी प्रथम डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन नरसिंहपूर गावच्या ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले.यावेळी महापुरुष महात्मा गांधीजी,महात्मा ज्योतिबा फुले,सरदार वल्लभभाई पटेल,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज,लोकमान्य बाळ गंगाधर टिळक,अशा महापुरुषांच्याही प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

      त्यानंतर प्रमुख पाहुणे व ग्रामस्थांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी आपले विचार व्यक्त केले.

      सायंकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य प्रथमेची मिरवणूक गावातील मुख्य रस्त्याने वाजत गाजत काढण्यात आली.

     या कार्यक्रमासाठी गावातील प्रमुख कार्यकर्ते सरपंच,उपसरपंच,आजी-माजी सरपंच,तरुण कार्यकर्ते,गावचे पोलीस पाटील,तसेच बावडा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी आणि सर्व नरसिंहपूर येथील बहुजन समाज मोठ्या संख्येने उपस्थितीत राहून भव्य आणि दिव्य जयंती उत्सवाचा कार्यक्रम उत्साहात पार पाडण्यात झाला.

      शेवटी महाभोजन देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.