Home Maharashtra मौजा माकोना ते मौजा गिरोला रस्त्याचे काम सुरू झाल्याने शेतकरी आणि गावकरी...

मौजा माकोना ते मौजा गिरोला रस्त्याचे काम सुरू झाल्याने शेतकरी आणि गावकरी समाधानी… — भिम आर्मी संविधान रक्षक दलाचे मोठे योगदान!

शुभम गजभिये 

 विशेष प्रतिनिधी..

     चिमूर तालुक्यातील मौजा माकोना ते मौजा गिरोला रस्त्याचे काम सुरू झाल्याने दोन्ही गावांतील शेतकरी आणि नागरिक समाधानी असल्याचे दिसून आले आहे.

       मागील ४० वर्षांपासून या रस्त्याच्या बांधकामांसाठी सार्वजनिक बांधकाम विभाग चंद्रपूर आणि चिमूर यांच्याकडे अर्जाद्वारे मागणी करण्यात येत होती.

     मात्र मौजा माकोना आणि मौजा गिरोला वासियांच्या पदरी निराशाच पडत होती.

             परंतु मागील २ वर्षांपूर्वी नागभिड येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी व चिमूर येथील सार्वजनिक बांधकाम विभाग उपविभागीय अभियंता यांनी सदर रस्त्याचे बांधकाम मंजूर केले आणि नियमानुसार कंत्राटदारांना रस्ता व मोऱ्या बांधकामांचे कंत्राट दिले होते.

        पण,कंत्राटदार यांनी सदर रस्त्याचे बांधकामाला वेळीच कामाला प्राधान्य दिले नाही.यामुळे भिम आर्मीचे चिमूर तालुका प्रभारी जगदीश मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांसह बांधावरच भर उन्हात आंदोलन करण्यात आले होते.

     या आंदोलनाची सार्वजनिक बांधकाम विभाग नागभिड-चिमूर,आणि कंत्राटदार गुप्ता यांनी दखल घेतली आणि रस्ता बांधकाम सुरू केले.सदर रस्त्याचे बांधकाम सुरू झाल्याने शेतकरी आणि भिम आर्मीचे चिमूर तालुका प्रभारी समाधानी आहेत.त्यांनी प्रत्यक्ष रस्ता बांधकामाची पाहणी केली.

             सदर रस्त्याचे बांधकाम करण्यासाठी भिम आर्मी संविधान रक्षक दल चिमूर तालुका संघटनाच्या वतीने अनेक आंदोलने केले होते.आखिर भिम आर्मी संविधान रक्षक दल चिमूर तालुका संघटनेला मोठे यश आले आहे.

     ४० वर्षांपासूनच्या मागणीचा रस्ता मंजुर झाला आणि कामाला सुरुवात सुध्दा झाली या रस्त्याकरीता भिम आर्मी संविधान रक्षक दल चिमूरचे मोठे योगदान आहे..