Home देशविदेश वैचारिक तुलनात्मक लेखमाला केवळ भारतीय जनतेसाठीच… — भाग = 003….

वैचारिक तुलनात्मक लेखमाला केवळ भारतीय जनतेसाठीच… — भाग = 003….

     ” सॉक्रेटीसने आपल्या संपूर्ण 71 वर्षाच्या आयुष्यात (इसवी सन पूर्व 470 – इसवी सन पूर्व 399 ) जस जसे ते ग्रीकमधील तत्कालीन ऐतिहासिक लोककला, शिल्पकला,परंपरा यांचा अभ्यास करत असत.

        त्याचप्रमाणे तेथील लोकशाहीमूल्यांवर आधारित असलेल्या जुन्या रीतीरिवाजांचा लोप पाऊन त्यावर सोफेस्टीकेटेड बाहेरून आलेल्या कुसंस्कृतीने आपल्याच देशातील ग्रीक सुसंस्कृतीला नष्ट करून निसर्गनियमविरोधी कुटनीतीने आक्रमण केल्याचे तर्कशास्त्राच्या अभ्यासानुसार समजले. 

        तेंव्हा त्यांनी याविषयी तत्कालीन लोकशाहीच्या नावावर निर्माण झालेल्या अप्रत्यक्ष हुकूमशाहीच्या विरोधात समाजातील तरुणात जागृत निर्माण करण्याचा विडा उचलला. त्यासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य खर्ची घातले.

         परंतु ,सॉक्रेटीसच्या या लोकशाही आणि तिच्या मूल्यांना अविष्कारीत करण्याच्या प्रयत्नांना हा तरुणांना सरकारच्या विरोधात भडकवतो. असा सुरुवातीला आरोप होत गेला.

         परंतु ,जेंव्हा ते अनेक तरुणांना एकत्र जमवून अनेक क्लिष्ट शब्द आणि विषयावर वादविवाद होत असत. 

       त्या चर्चेतून त्या तरुणांना ते प्रश्न विचारून,त्यांच्या तोंडून उत्तरे वदवून घेत,आपल्या बुद्धीच्या बळावर ते सत्यापर्यंत तरुणांना घेऊन जात आणि त्यांच्या काळातील चालीरीती,समाजव्यवस्था कशा चुकीच्या आहेत, त्या मूळ कशा होत्या. याविषयी ते तरुणांना डोळस आणि सदविचारी बनवत असत. त्यातील दहा तरुणातील दोन तरुणांना पटत असे. सुरुवातीला अशा विषयावरील चर्चा आणि वादविवाद म्हणजे तरुणांना निखळ मनोरंजन आणि वेळखाऊपणाचे वाटे.

        परंतु ,याच चर्चेतून शेवटी सत्याचा सारांश सॉक्रेटीस सिद्ध करीत असत,तेंव्हा तेच मनोरंजन, तोच वादविवाद शेवटी तत्वज्ञान वाटू लागले.

         यातून हळूहळू तरुणांत सॉक्रेटीस विषयी आकर्षण निर्माण होऊ लागले.आणि व्यवस्थेच्या म्हणजे तत्कालीन सरकारच्या विरोधात असंतोष निर्माण होऊ लागला. याचे प्रमाण जसेजसे वाढत गेले, तसेतसे संपूर्ण ग्रीकमध्ये त्यांचा बोलबाला वाढत गेला.आता मात्र या सॉक्रेटीसचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी सरकारने/ व्यवस्थेने कंबर कसली.

           परंतु , त्यांच्याविरोधात एकही पुरावा मात्र गुन्हा सिद्ध करण्यासाठी मिळत नव्हता हीच मोठी अडचण सरकारची होती. याच संधीचा लाभ घेत सॉक्रेटिसने ग्रीकमधील हजारो तरुणांना तत्कालीन सरकारच्या निर्णयाविरोधात, किंवा त्यांच्या अंमलबजावणी विरोधात जागृत करण्याचे प्रमाण वाढत नेले.

      त्यांची वेगवेगळ्या क्लिष्ट शब्द आणि विषयांना सत्यार्था पर्यंत पोहचवून त्याचा संबंध मूळ ग्रीक सुसंस्कृतीत ( आर्याच्या अतिक्रमणापूर्वीच्या) कसा दडलेला आहे. हे ते सिद्ध करून तरुणांना त्याविषयी जागृत करत असत. आणि हीच सॉक्रे टिसचे कार्य सोफेस्टांच्या ( आर्याच्या ) जिव्हारी लागण्यास सुरुवात झाली. कारण ही तरुण मंडळी व्यवस्थेला जाब विचारण्यासाठी प्रवृत्त होत होती. याचे प्रमाण जसजसे वाढत गेले तसतसे संपूर्ण ग्रीकमध्ये सॉक्रेटिसचा बोलबाला,प्रसिद्धी वाढत गेली. याचा परिणाम मात्र सॉक्रेटीसला घेरण्यासाठी ग्रीकची सारी व्यवस्था एकवटली.

        त्यासाठी मिलिटस नावाच्या सोफेस्टीकेटमध्ये तरबेज असलेल्या (आपल्या देशातील आर्यचाणक्याप्रमाणे ) या मिलिटसने सॉक्रेटीसच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल केले. विशेष म्हणजे हा सॉक्रेटीस तरुणांना कर्तव्यभ्रष्ट करतो, सरकारच्या / व्यवस्थेच्या विरोधात तो तरुणांची माथी भडकवतो. आपल्या नगरातील देवदेवतांना मानतच नाही उलट तो त्यांचा अपमान करतो.असे कितीतरी गुन्हे सॉक्रेटिसच्या विरोधात या मिलिटसने (आर्यचाणक्य ) दाखल केले. आणि शेवटी त्यांना तुरुंगात डांबले……..

— (उर्वरित भाग उद्याच्या भागात)……..

जागृतीचा कृतिशील लेखक…

  अनंत केरबाजी भवरे

संविधान विश्लेषक,रेणापूरकर,औरंगाबाद, 7875452689…