Home देशविदेश तक्रार गावकऱ्यांच्या विरुद्ध,पत्रकारांना नाहक त्रास कशासाठी? पत्रकार जमावाचा हिस्सा राहात नाही..‌ ...

तक्रार गावकऱ्यांच्या विरुद्ध,पत्रकारांना नाहक त्रास कशासाठी? पत्रकार जमावाचा हिस्सा राहात नाही..‌ — नागरिकांनाही विशेष अधिकार भारतीय संविधानांनी दिलेले आहेत हे अधिकारी आणि कर्मचारी कसे काय विसरता! — हायवा मध्ये वाळूच होती,खोट्या अहवालानुसार हायवा सोडले,दबाव कुणाचा? — बदनामीला वाचवण्यासाठी श्री.स्वप्निल श्रिराम यावले यांनी केलेली तक्रार खोटी,तक्रारीतील माहितीही खोटी… — मौजा पिंपळगाव वासियांना खोट्या तक्रारीला अनुसरून फसविण्याचा कट?,हा चिमूर तालुक्यातील नागरिकांत भिती निर्माण करण्याचाच प्रकार… — चंद्रपूर जिल्हाधिकारी व चंद्रपूर जिल्हा पोलिस अधिक्षक यांनी जातीने लक्ष देणे झाले आहे आवश्यक! 

प्रदीप रामटेके 

  मुख्य संपादक

       चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यात मौजा पिंपळगाव आहे.मौजा पिंपळगाव ते मौजा कोटगाव रस्त्यावरील नदीपात्रातून वाळू भरलेले दोन हायवा मौजा पिंपळगाव कडे येत असताना दिनांक २१ एप्रिल २०२५ रोज सोमवारच्या रात्रोला ८ वाजताच्या दरम्यान मौजा पिंपळगाव वासियांनी गावासेजारीच अडवले.

       सदर हायवामध्ये वाळू भरलेली असल्यामुळे दोन्ही हायवा ग्रामपंचायत पिंपळगाव समोर लावण्यात आले तर दोन्ही हायवात वाळू भरणारे पोकलॅंड जिथे होते तिथेच जागेवर ठेवण्यात आले होते हे वास्तव घटनाक्रमातंर्गतचा एक भाग आहे.

*****

वाळू भरलेले हायवा आणि कर्तव्यहिन अधिकारी….

       वाळू भरलेले हायवा पकडल्यानंतर चंद्रपूर जिल्हातंर्गत सर्व अधिकाऱ्यांना उचित कारवाईसाठी माहिती देण्यात आली होती व संबंधित अधिकाऱ्यांनी मोका स्थळावर येवून वाळू भरलेल्या हावाचा पंचनामा मौजा पिंपळगाव येथे येऊन नागरिकांसमोर करावा अशी विनंती करण्यात आली.

         मात्र,कुठलेही जबाबदारी अधिकारी मोका स्थळावर आले नाही.उलट हायवा व पोकलॅंड हे चिमूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार किर्तीकुमार भांगडीया यांच्यासोबत संबंध असलेल्या बड्या कंत्राटदारांचे असल्याने अधिकाऱ्यांनी स्वतःचे मोबाईल बंद करुन टाकले असल्याचा संतापजनक अनुभव मौजा पिंपळगाव वासियांना आणि उपस्थित पत्रकारांना आला.

        यानंतर भिसी पोलिस स्टेशनचे जांभुळघाट बिट जमादार विजय बगडे हे गाडी चालक पोलिस शिपाई यांच्या सोबत आले आणि त्यांनी वाळू भरलेल्या दोन्ही हावाचा पंचनामा मौजा पिंपळगाव वासियांसमोर न करता भिसी पोलिस स्टेशनला जमा केले.

          मात्र,गाडी चालक पोलिस शिपाई हे त्या रात्रोला मौजा पिंपळगाव वासियांनांच धमकावत असल्याचे पुढे आले.याचा अर्थ असा की,वाळू भरलेल्या हायवावर कारवाई न करता हायवा सोडून देण्याचा खल आधिच घोटण्यात आला होता असे गाडी चालक पोलिस शिपाई यांच्या हालचाली वरुन मौजा पिंपळगाव वासियांना दिसून येते आहे.

*****

बिट जमादार विजय बगडे यांनी मोका स्थळावर पंचनामा का म्हणून केला नाही?

        दिनांक २१ एप्रिल ला रात्रोच्या वेळी वाळू भरलेले हायवा भिसी पोलिस स्टेशनला जमा करण्यासाठी जांभुळघाट बिट जमादार विजय बगडे हे गाडी चालक पोलिस शिपाई यांच्या सोबत मोका स्थळावर आले होते.

       त्यांनी मौजा पिंपळगाव वासियांच्या समोर वाळू भरलेल्या दोन्ही हायवांचा मोक्याच्या ठिकाणी पंचनामा का म्हणून केला नाही?हा गंभीर प्रश्न उपस्थित होतो आहे.

    तद्वतच त्यांनी उपस्थित साक्षदारांचे बयान मोकास्थळावर का म्हणून नोंदविले नाही? हा मुद्दाच सुध्दा अनेक शंकांचे घर निर्माण करतो आहे.

*****

चिमूर तहसीलदार आणि पोलिस धुळफेक करताहेत?

        मौजा पिंपळगाव येथील नागरिकांनी वाळू भरलेले दोन हायवा पकडल्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील संबंधित सर्व अधिकाऱ्यांसह चिमूर तहसीलदार श्रिधर राजमाने आणि भिसी पोलिस स्टेशनचे ठाणेदार जितेंद्र चांदे यांच्या सोबत संपर्क केला गेला होता.(ठाणेदार जितेंद्र चांदे हे रजेवर होते) 

          संपर्क केल्याबरोबर तहसीलदार श्रिधर राजमाने आणि भिसी पोलिस स्टेशनचे प्रभारी ठाणेदार निशांत फुलेकर यांनी कर्तव्यदक्षता दाखवित आपल्या सहकाऱ्यांसोबत घटना स्थळ गाठायला हवे होते.

      आणि प्रकरणाचे गांभीर्य ओळखून प्रकरणाला अनुसरून मोका स्थळावर उचित कारवाई करण्याची तसदी घ्यायला हवी होती.

          मात्र,वाळू भरलेल्या हायवा प्रकरणाची आधिच सर्व प्रकारच्या छडयंत्रकारी उपाययोजनांतून खिचडी शिजलेली असल्याने ते मोका स्थळावर अजिबात आले नाही अशी शंका घेण्यास पुरेसा वाव आहे.

        कारण चिमूर तहसीलदार श्रिधर राजमाने यांच्या हायवा सोडणाऱ्या बेकायदेशीर कृतीतून व पोलीस स्टेशन भिसी येथे करण्यात आलेल्या खोट्या तक्रारीतून स्पष्ट होते आहे.

*****

नागरिकांना राष्ट्रीय संपत्तीचे आणि संपदेचे संरक्षण आणि रक्षण करण्याचा भारतीय संविधानाच्या माध्यमातून भांदवी कलम ५१ नुसार मुलभूत अधिकार मिळाला आहे…

         भारतीय संविधानात अंतर्भूत असलेल्या मुलभूत कर्तव्या अंतर्गत भांदवी कलम ५१ नुसार राष्ट्रीय संपत्तीचे आणि संपदेचे संरक्षण आणि रक्षण करण्याचा नैतिक अधिकार या देशातील सर्व नागरिकांना मिळालेला आहे.

        या मुलभूत कर्तव्यातंर्गतच,वाळू सारख्या महत्त्वपूर्ण खनिज संपत्तीला रात्रोच्या वेळी चोरुन नेत असताना मौजा पिंपळगाव वासियांनी वाळू भरलेले दोन हायवा व एक पोकलॅंड मौजा पिंपळगाव जवळ पकडले आणि दोन्ही हायवा मौजा पिंपळगाव ग्रामपंचायत कार्यालयाच्या पुढे उभे केले.

       भांदवी कलम ५१(छ) नुसार वने,सरोवरे,नद्या,व वन्यजीव सृष्टी यास नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करुन त्यात सुधारणा करणे आणि प्राणी मात्रांबदल दयाबुध्दी बाळगणे हा अधिकार देशातील सर्व नागरिकांना भारतीय संविधानाच्या माध्यमातून मिळालेला आहे.

      तद्वतच भांदवी कलम ५१ (झ) नुसार सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे व हिंसाचाराचा निग्रहपुर्वक त्याग करणे,हा अधिकार सुध्दा भारतीय संविधानाच्या माध्यमातून सर्व नागरिकांना मिळालेला आहे.

       यामुळे त्यांच्या परिसरातील वाळू चोरुन नेणाऱ्या दोन हायवा वाहनाला मौजा पिंपळगाव वासियांनी पकडून मौजा पिंपळगाव ग्रामपंचायत कार्यालयाच्या पुढे उभे केले यात त्यांनी कुठल्याही प्रकारची चूक केली नाही आणि त्यांनी कुठल्याही प्रकारचा गुन्हा केलेला नाही असे भांदवी कलम ५१ अंतर्गत नागरिकांचा मुलभूत अधिकार स्पष्ट सांगतो आहे.

*****

नागपूर येथील श्री.स्वप्निल श्रिराम यावले यांनी दिलेली भिसी पोलिस स्टेशनला तक्रार आणि त्या तक्रारीचे खरे व खोटे वास्तव…

            मौजा पिंपळगाव हद्दीतून वाळू भरलेले दोन हायवा वाहान हे मौजा पिंपळगाव वासियांनी गावासेजारीच अडवले असल्याचे पुढे आले आहे व यानंतर सदर दोन्ही हायवा वाहने स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयाच्या पुढे दिनांक २१ एप्रिल २०२५ रोज सोमवारच्या रात्रोला उभे केले ‌होते.

        यामुळे त्यांनी सरकारी रस्ता बांधकामात अडथळा निर्माण केला असे होत नाही.तर त्यांनी वाळू सारख्या राष्ट्रीय खनीज संपत्तीचे संरक्षण केले आणि महाराष्ट्र शासनास व स्थानिक प्रशासनास मदत केली असे होते आहे.

          मनिष नगर,नागपूर येथील रहिवासी असलेले श्री.स्वप्निल श्रिराम यावले हे चिमूर आमदार किर्तीकुमार भांगडीया यांच्या माजी आमदार बापाच्या आणि भावाच्या एम.के.एस.कंपनी सोबत आणि इतर कंपनी सोबत भागिदार म्हणून काम करतात असे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

          याचबरोबर रस्त्याचे बांधकाम सुरू असताना मौजा पिंपळगाव वासिय येथील दोनचार नागरिकांनी रस्ता बांधकामात अडथळा निर्माण केला व शिव्या दिल्या असल्याचे सुध्दा त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

           मात्र चोरीची वाळू भरून नेत असलेले दोन्ही हायवा मौजा पिंपळगाव जवळच,मौजा पिंपळगाव वासियांनी रात्रोच्या ८ वाजता दरम्यान अडकवले होते.

        याच वेळेचा संदर्भ घेऊन रात्रोच्या वेळी रस्ता बांधकाम अडविले,शिविगाळ केली,कामावरील मिशनरी ताब्यात घेतले व ग्रामपंचायतला जमा केले,असे तक्रारदार श्री.स्वप्निल श्रिरामजी यावले यांचे म्हणणे तक्रारी नुसार आहे ते म्हणणे खोटे असल्याचे दिसून येते आहे.

            मौजा पिंपळगाव वासियांनी गावासेजारीच वाळू भरलेले दोन हायवा अडवले व हायवा मध्ये वाळू भरणारे एक पोकलॅंड अडविले आणि आपले मुलभूत कर्तव्य पार पाडले.

        याची जाणिव,”प्रधानहेटी-रामपूर-बोडधा-दाबकाहेटी- पिंपळगाव- डोमा- मुक्ताई रस्ता बांधकाम करणाऱ्या,१) एम.के.एस.,२) एम.ई.एस.,३) एम.एच.जे.व्ही.कंपनीच्या सुत्रधारांना झाली.याचबरोबर रात्रोच्या वेळी वाळूचे अवैध उत्खनन केल्यामुळे मोठ्या रक्कमेची दंडात्मक कारवाई व फौजदारी कारवाई होवू शकते याची कल्पना सुध्दा त्यांना आली.

         यामुळे वाळू भरलेल्या दोन हायवा वाहनावरील व वाळू भरण्यासाठी आणलेल्या पोकलॅंडवरील कारवाई टाळण्यासाठी मौजा पिंपळगाव वासियांच्या विरोधात श्री.स्वप्निल श्रिरामजी यावले यांच्या माध्यमातून खोटी तक्रार भिसी पोलिस स्टेशनला देण्यात आली असल्याचे वास्तविक घटना स्थिती सांगून जातय.

*****

चिमूर तहसीलदार आणि भिसी पोलिसांची हायवा व पोकलॅंड वर कारवाई टाळण्यासाठी अशीही मांडलिकत्वाची मौजा पिंपळगाव वासियांवर अन्याय करणारी कृती…

           चिमूर तहसीलदार श्रिधर राजमाने यांच्याकडून जांभुळघाट मंडळ अधिकारी यांना दोन्ही हायवा मध्ये माती मिश्रित वाळू असल्याचा खोटा अहवाल सादर करण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता.

     या दबावाला अनुसरून तहसीलदार श्रिधर राजमाने यांना जांभुळघाट मंडळ अधिकारी यांनी दोन्ही हायवा मध्ये माती मिश्रित वाळू असल्याचा खोटा अहवाल पाठविला.

       मंडळ अधिकारी यांनी दोन्ही हायवा मध्ये काय आहे हे प्रत्यक्ष न बघताच तहसीलदार श्रिधर राजमाने यांनी सांगितल्या प्रमाणे दोन्ही हायवा मध्ये माती मिश्रित वाळू भरलेली असल्याचा अहवाल तहसीलदार श्रिधर राजमाने यांना तात्काळ दिला.

         यानंतर वेळ न दवडता सत्ताधारी आमदारांचे व क़पनीधारकांचे मांडलिकत्व स्वीकारलेल्या तहसीलदार श्रिधर राजमाने यांनी दोन्ही हायवा व पोकलॅंड सोडून दिले.

       तहसीलदार श्रिधर राजमाने यांच्या या अयोग्य आणि बेकायदेशीर कृतीमुळे भिसी पोलिस स्टेशनला मौजा पिंपळगाव वासियांच्या विरोधात खोटी तक्रार देण्याचा मार्ग मोकळा झालाय.

          वाळू भरलेले हायवा व पोकलॅंड माती मिश्रित वाळू असलेल्या खोट्या अहवालानुसार सोडून देणे म्हणजे बड्या चोरांचे साथीदार असणे होय? किंवा जाणीवपूर्वक त्यांना साथ देणे होय‌,अशीच कृती चिमूर तहसीलदार श्रिधर राजमाने आणि भिसी पोलिस स्टेशनच्या प्रभारी सुत्रधारांनी केली असल्याचे घटनाक्रमावरुन दिसून येते आहे.

         याचबरोबर राष्ट्रीय खनीज संपत्तीचे रक्षण करणाऱ्या मौजा पिंपळगाव वासियांच्या राष्ट्रीय अशा उत्तम कर्तव्याला पायदळी तुडवून त्यांच्यावरच अन्याय अत्याचार तहसीलदार श्रिधर राजमाने आणि भिसी पोलिसांकडून करणे होय,असे म्हटले पाहिजे?.

******

पत्रकारांचा व नागरिकांचा भांदवी कलम १९ (छ) व (घ) नुसार मुलभूत अधिकार..

        भारतीय संविधानाच्या माध्यमातून देशातील नागरिकांना भांदवी कलम १९ (छ) नुसार कोणताही पेशा आचरण्याचा अथवा कोणताही व्यवसाय,किंवा धंदा चालविण्याचा हक्क प्राप्त झालेला आहे.

       याचबरोबर भांदवी कलम १९ (घ) नुसार भारताच्या राज्यक्षेत्र सर्वत्र कोणत्याही भागात मुक्तपणे संचार करण्याचा अधिकार प्राप्त आहे.

         यामुळे पत्रकार हे केव्हाही आणि कुठेही वृत्त संकलनासाठी जावू शकतात आणि घटनाक्रमाचे किंवा घडामोडींचे वास्तव आपल्या लेखनीच्या माध्यमातून देशातील नागरिकांपर्यंत आणि शासन-प्रशासना पर्यंत पोहचवू शकतात.मात्र पत्रकार हा जमावाचा हिस्सा राहात नाही,हे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

         असे असताना भिसी पोलिस स्टेशन द्वारे पत्रकार विलास मोहिनकर यांना बयानासाठी वारंवार बोलाविले जात आहे.बयानामागचा उद्देश भिसी पोलिसांचा स्पष्ट झालेला आहे.

       आणि तो म्हणजे मौजा पिंपळगाव येथील निरापराध नागरिकांना विविध कलमान्वये अकारण अटक करणे होय.

         मौजा पिंपळगाव येथील अनोळखी व्यक्तींवर भांदवी कलम ३२९(३),३५२,३५१(२),३(५), नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

     मात्र,पत्रकार विलास मोहिनकर हे अनोळखी व्यक्तींचे नाव कसे काय सांगणार?हा मुद्दाही तितकाच महत्त्वाचा आहे.

*****

चिमूर तहसीलदार आणि भिसी पोलिस संशयाच्या भोवऱ्यात..

        मौजा पिंपळगाव वासियांचे वाळू चोरीच्या सत्य घटनेला अनुसरून चंद्रपूर जिल्हातंर्गत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बयान नोंदवावे व त्यांच्या बयानानुसार चिमूर तहसीलदार आणि भिसी पोलिसांच्या चुकीच्या आणि संसयास्पद भुमिकांची वरिष्ठांकडून तात्काळ चौकशी होणे आवश्यक झाले असल्याचे घटनाक्रमाचे चित्र आहे…

         भांडवलदार कंत्राटदारांच्या वाळू चोरी प्रकरणावर बेकायदेशीर पणे पांघरूण घालणाऱ्या आणि त्यांना अधिकारात बेकायदेशीर संरक्षण देणाऱ्या अधिकाऱ्यांची केवळ चौकशीच नव्हे तर चौकशी नंतर आवश्यक कारवाई त्यांच्यावर होणे आवश्यक असल्याचे मत चिमूर तालुक्यातील जाणकार व अभ्यासू नागरिकांचे आहे.