Home Maharashtra रेती भरलेल्या ट्रॅक्टर जप्त – महसूल विभागाची धडक कारवाई…

रेती भरलेल्या ट्रॅक्टर जप्त – महसूल विभागाची धडक कारवाई…

शुभम गजभिये 

 विशेष प्रतिनिधी…

        चिमूर तालुकातंर्गत मौजा डोमा – डोंगरगांव रोडवर रेती भरलेल्या ट्रॅक्टर जप्त करण्यात महसूल विभागाला यश आले आहे.

         दिनांक(26/4/2025) ला सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास डोमा – डोंगरगांव‌ रस्त्यावर विना परवाना एक ब्रास रेती भरलेला ट्रॅक्टर घेऊन जात असतांना गस्तीवर असलेल्या महसूल विभागाचे अधिकारी तलाठी स्वप्नील उमरे,केतनसिंग घरकेले,उमेश पाटिल,शुभम बदकी यांनी सदर ट्रॅक्टरला अडवून ट्रॅक्टर वर जप्ती ची कारवाई करुन गौरव सुरेश चौधरी यांच्या मालकीचे ट्रॅक्टर तहसील कार्यालय चिमूरला जमा करण्यात आले आहे. 

    सदरची कारवाई चिमूर तहसीलदार यांच्या सुचनेनुसार उपरोक्त महसूल विभागाचे तलाठी यांनी केली आहे.